''सांगलीची जनता वाघासारखी आहे. ती कारस्थाने सहन न करता चंद्रहार पाटील यांच्या मागे उभी आहे.’’
सांगली : ‘‘सांगलीत वसंतदादा पाटील नावाचा वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही पाहिला आहे. बाळासाहेब ठाकरे वाघ होते. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) वाघ असतील, मात्र ते वाघ आहेत की नाही, हे चार जूनला कळेल. त्यांनी मोठ्या ताकदीने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना विजयी केले तर त्यांना वाघ ही पदवी देऊ,’’ असा टोला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
ते म्हणाले, ‘‘इकडल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना स्वतःला वाघ सिद्ध करायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना विजयी केले पाहिजे. सगळ्यांनी मिळून काम करावे. आम्ही ४ जूनला येऊन त्यांचा सत्कार करू. जाहीरपणे सांगू, हे वाघ आहेत. शिवसेना ही प्रमाणित वाघ आहे. आमची निशाणी वाघ आहे. वाघाचा पंजा आहे.
आमचे बोधचिन्ह वाघाचे आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ते चितारलेले आहे. वाघ समोरून हल्ला करतो. तो झुडपात बसून कारस्थान करत नाही. त्यामुळे सांगलीत कोण किती वाघ आहेत कळेल. सांगलीची जनता वाघासारखी आहे. ती कारस्थाने सहन न करता चंद्रहार पाटील यांच्या मागे उभी आहे.’’
ते म्हणाले, ‘‘चंद्रहार पाटील कुठे कमी पडतात सांगा. त्यांचे साखर कारखाने नाहीत, त्यांनी कर्जे बुडवली नाहीत, संस्था बुडवल्या नाहीत हा त्यांचा कमजोरपणा आहे का? ते प्रामाणिक आहेत, ती त्यांची ताकद आहे. अनेक ठिकाणी थोडे कमजोर उमेदवार आहे, आम्ही त्यांचा प्रचार करतोय ना, कारण आम्ही वाघ आहोत. त्यांना पुढे घेऊन जातोय. सांगलीत जयंत पाटलांची डरकाळी वाघाची आहे. वाघाच्या ओठावर एक, पोटात एक नसते.’’ सांगलीतील काँग्रेसच्या हालचालींबाबत ते म्हणाले, ‘‘माझी सांगलीबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी मी बोललो आहे. मी चर्चा करतो, तेव्हा माझ्या पद्धतीने करतो.’’
‘आवश्यकता भासल्यास मी ठाकरेंना मदत करायला पुढे असेन,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले,‘‘मोदी स्वतः अडचणीत आहेत. अडचणीतील व्यापारी लाभासाठी खोटे बोलतो, असे चाणक्याने सांगितले आहे. मोदींना चाणक्याचे वेड आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत अडचणी निर्माण करणारे हे लोक आहेत. त्यांना मदत करायची असती तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली नसती. बेइमानाला पक्ष, चिन्ह दिले नसते. त्यांचे प्रेम खोटे आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.