ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर उफाळलेला वाद दिल्ली दरबारात पोहोचवण्यात आला आहे. महाविकास आघाडीत अजूनही पाच जागांवरून वाद आहे.
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) वाद टोकाला गेला आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने काँग्रेस (Congress) नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरेंच्या खेळीला शह देण्यासाठी विशाल पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करावी, असा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसने राष्ट्रीय समितीकडे पाठवला आहे. त्याला हिरवा कंदील मिळतोय का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विशाल पाटील (Vishal Patil) यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, यावर जिल्ह्यातील नेते ठाम आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत दुसरा विचार होणार नाही. आम्हाला ‘हात’ चिन्ह हवेच, आम्ही काँग्रेसकडूनच लढणार, असा स्पष्ट संदेश मुंबईतील बैठकीत देण्यात आला आहे. आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam), आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज मुंबईत तळ ठोकून नेत्यांच्या भेटी घेतल्या.
ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर उफाळलेला वाद दिल्ली दरबारात पोहोचवण्यात आला आहे. महाविकास आघाडीत अजूनही पाच जागांवरून वाद आहे. त्यात मुंबईतील एका जागेसह सांगली, रामटेक, आदी मतदारसंघांचा समावेश आहे. असे असताना सांगलीची घोषणा परस्पर का केली, याबाबत काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना जाणीवपूर्वक काँग्रेसची कोंडी करीत आहे.
काँग्रेसच्या गडात जाऊन शिवसेनेचे उमेदवार जाहीर करत आहे हे चालणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय नेत्यांकडे खदखद व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या हालचालींबाबत नाराजी व्यक्त करत काँग्रेस कोणत्याही स्थितीत सांगली सोडणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्यातील नेत्यांना दिली आहे.
काँग्रेसने विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करावी, यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी पूर्ण दबाव निर्माण केला आहे. परंतु, महाविकास आघाडीत विघ्न येऊ नये म्हणून त्याला मंजुरी मिळाली नाही तर काय, यावरही चर्चा सुरू आहे. विशाल पाटील यांनी बंडखोरी करावी आणि ही बंडखोरी संपूर्ण काँग्रेसची असेल, असा विचार मांडण्यात आला आहे. आमदार विश्वजित कदम यांनी जिल्ह्याचे नेते म्हणून या बंडखोरीचे नेतृत्व करावे, असा मुद्दादेखील काँग्रेस कार्यकर्ते रेटत आहेत. अर्थात, त्यांना विशाल हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील, असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी दिला आहे.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांच्यात खलबते
शुक्रवारी पहाटे सगळे नेते मुंबईला रवाना
दुपारी १२ वाजता बाळासाहेब थोरात यांची भेट. नाना पटोलेंशी मोबाईलवरून संपर्क
ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजीची काँग्रेस नेत्यांची माहिती. दिल्लीला निरोप. विशाल पाटील यांच्या उमेदवारीची दिल्लीतून घोषणा करण्याबाबत विनंती
रात्री जिल्ह्यातील नेते मुंबईत पुन्हा एकत्र. सोनिया गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्या भूमिकेकडे लक्ष
सांगलीतील उमेदवारीबाबत आधी चर्चा झालेल्या आहेत. आम्ही काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करू. नाना पटोलेंशी बोलू. नाना आमचे मित्र आहेत. यातून मार्ग निघेल.
-संजय राऊत, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.