Sangli Loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Sangli Loksabha Constituency : विशाल पाटील भिडणार की ‘ऑफर’ घेणार? ; सबंध राज्याचे लक्ष

महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी झाल्यानंतर बंडाचा पवित्रा घेणारे काँग्रेस नेते विशाल पाटील लोकसभेला भिडणार की विधानपरिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारून बंड थंड करणार, याचा फैसला उद्या (ता. २२) होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी झाल्यानंतर बंडाचा पवित्रा घेणारे काँग्रेस नेते विशाल पाटील लोकसभेला भिडणार की विधानपरिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारून बंड थंड करणार, याचा फैसला उद्या (ता. २२) होणार आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारीची अंतिम मुदत उद्या (ता. २२) दुपारी तीन वाजता संपत आहे. त्याआधी आमदार विश्‍वजित कदम व विशाल यांच्यावर काँग्रेसकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. सोबतच त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द दिला आहे.

महायुतीत भाजपचे संजय पाटील, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्‍चित आहे. मात्र, भाजप विरुद्ध काँग्रेस बंडखोर अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून आमदार विश्‍वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला जात आहे. पाटील यांची कोंडी केली जात असल्याच्या भावनेतून आज जिल्हाभरातील कार्यकर्त्यानी विशाल यांची भेट घेतली. कोणत्याही स्थितीत मागे फिरू नका, असे आवाहन केले. विशाल पाटील यांनी लढण्यावर ठाम असल्याचे सांगत त्यांना आश्‍वस्त केले.

प्रतीक पाटील कार्यकर्त्यांमागे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांचा निर्णय काय असेल, याकडे विशेष लक्ष असेल. याशिवाय, एकूण २५ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे विशाल पाटील यांनी माघार घेतली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी अर्ज भरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT