दा घराण्याची जागा शिवसेनेने हिसकावून घेतली, असा वाईट संदेश राज्यात जातो आहे.
सांगली : ‘सांगली लोकसभा मतदार संघात (Sangli Loksabha Constituency) कुणीतरी स्वार्थ साधण्यासाठी वेगळी मांडणी करत असेल तर त्याला फार महत्त्व देऊ नका. वसंतदादा पाटील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नेहबंधाची आठवण ठेवा,’ असे आवाहन करणारे डिजिटल पत्र वसंतदादांचे स्वीय सहायक यशवंत हाप्पे (Yashwant Happe) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत यांना पाठवले आहे. त्याबाबत वसंतदादा आणि बाळासाहेबांचे एक जुने छायाचित्र पाठवले आहे.
त्यांनी या डिजिटल पत्रात म्हटले आहे, ‘शिवसेना स्थापन झाली, तेव्हाच्या कार्यक्रमाला वसंतदादा व शालिनीताई उपस्थित होते. डॉ. हेमचंद्र गुप्ते व मनोहर जोशी हे महापौर पदाचे उमेदवार असताना काँग्रेसची मते मिळवून देण्यासाठी दादांनी मदत केली होती, याचा मी साक्षीदार आहे. त्या वेळेपासून दादांच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी दादांचा व्यक्तिगत सहायक राहिलो.
१९८५ मध्ये महानगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मराठी उमेदवारांना डावलले जात आहे, हे लक्षात आल्यावर दादांनी एकच वाक्य वापरले, ‘मुंबई महाराष्ट्रात आहे; पण मुंबईत महाराष्ट्रात दिसला पाहिजे.’’ या एकाच वाक्यावर मुंबईत महानगर पालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. ही बाब साऱ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे.’
‘दादांचे निधन झाले, त्या वेळी बाळासाहेबांनी ‘वटवृक्ष कोसळला’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. त्यांचे दादांशी भावनिक नाते होते. ते ध्यानात घ्या. सांगली लोकसभेची जागा शिवसेना मागते आहे. दादा घराण्याची जागा शिवसेनेने हिसकावून घेतली, असा वाईट संदेश राज्यात जातो आहे. जे लोक आपल्याला हे सुचवत आहेत, त्यांचा उद्देश लक्षात घ्या. ते आपले राजकीय वैर शमवून घेत आहेत.
२०१४ मध्ये प्रतीक पाटील मोदी लाटेमुळे हरले. २०१९ मध्ये काँग्रेसच्या काहीं नेत्यांमुळे; ज्यात अशोक चव्हाण यांचा प्रामुख्याने सहभाग होता, ‘सांगली’ची जागा स्वाभिमानीला सोडावी लागली, हा इतिहास लक्षात घ्या. वसंतदादा घराण्याला संकटात आणण्याचा प्रयत्न होत असताना त्यात शिवसेना सहभागी असू नये; उलट वसंतदादा घराण्याला बळ द्यावे,’ असे आवाहन श्री. हाप्पे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.