Sangli Loksabha esakal
लोकसभा २०२४

Sangli Loksabha : संजय पाटलांच्या उमेदवारीवरुन माजी आमदाराची तीव्र नाराजी; भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता!

गेली लोकसभा निवडणूक विशाल पाटील यांना काँग्रेसच्या चिन्हावर लढवता आली नव्हती.

सकाळ डिजिटल टीम

आता पुन्हा एकदा विलासरावांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत संजय पाटील यांच्या विरोधात बंड पुकारले आहे.

जत : भाजपकडून (BJP) लोकसभेसाठी संजय पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर होताच माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी पक्षांतर्गत नाराजीचा सूर लावला आहे. त्यामुळे भाजपला पक्षांतर्गत आव्हानाचा पहिल्यांदा सामना करावा लागेल, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, समोर काँग्रेसचे (Congress) विशाल पाटील की शिवसेनेचे चंद्रहार पाटील याचा फैसला अद्याप न झाल्याने लढतीचे नेमके चित्र अद्याप स्पष्ट नाही.

जत तालुक्यात काँग्रेसचा विद्यमान आमदार विक्रम सावंत आणि मूळचा वसंतदादा गट यांची एकत्रित ताकद संजय पाटील (Sanjay Patil) यांच्यासाठी काट्याच्या लढतीचे नक्की आव्हान असेल. भाजपचे नेते डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे व जत विधानसभा प्रचारप्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांची आजघडीला जगताप यांनी पक्षाबरोबर राहण्याची भूमिका आहे. हा पक्षांतर्गत वाद संपवला जाईल, अशी त्यांना आशा आहे. गेली लोकसभा निवडणूक विशाल पाटील यांना काँग्रेसच्या चिन्हावर लढवता आली नव्हती.

शिवाय, ‘वंचित’च्या माध्यमातून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी तालुक्यात धनगर व अन्य मागासवर्गीय समाजाची दोन नंबरची मते पटकवीत विशाल यांना मोठा धक्का दिला होता. आता जगतापांची नाराजी हा तालुक्यात सध्या चर्चेचा विषय आहे. खासदार पाटील यांनी फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आपला राग प्रखरपणे पक्ष व प्रसार माध्यमांतून व्यक्त केला आहे. गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत या दोघांतील वाद विकोपाला गेला होता. आता पुन्हा एकदा विलासरावांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत संजय पाटील यांच्या विरोधात बंड पुकारले आहे.

विरोधकांपैकी यंदाही विशाल यांच्या उमेदवारीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चंद्रहार लढतीत असतील. महा विकास आघाडीच्या प्रचाराला आमदार सावंत किती ताकद लावणार, हा प्रश्‍न आहे. मूळचे दादा गटाचे सुरेश शिंदे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच आहेत. ते जयंत पाटील यांच्यासमवेत आहेत. त्यांचे काँग्रेस आमदार सावंत यांच्याशी असलेले सख्य जगजाहीर आहे. मात्र विलासरावांशी असलेला त्यांची सूर पाहता विशाल यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्‍यांच्यासाठी राजकीय चित्र नक्की आशादायी आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीचे भिजत घोंगडे आहे.

पाणीप्रश्‍नाकडे दुर्लक्ष

तालुक्यात विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचा श्रेयवाद रंगला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आंदोलने सुरू आहेत. मात्र सध्याच्या टंचाईच्या स्थितीत तातडीच्या उपाययोजनांकडे मात्र नेत्यांचे लक्ष नाही. योजना राज्य सरकारची असूनही खासदार पाटील यांनी या योजनेचे श्रेय आपलेच असल्याचे बिंबवण्यात आघाडी घेतली आहे. कर्नाटकातून उमदी भागात टंचाईच्या उपाययोजना म्हणून पाणी घेण्यासाठीच्या कराराकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष आहे. येत्या दोन महिन्यांत निवडणुकीच्या गोंधळात शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे जनतेचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT