Satara Lok Sabha Ajit Pawar esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : '..तसं नाही केलं तर पवारांची औलाद सांगणार नाही'; कोणाला उद्देशून म्हणाले अजितदादा?

जिल्ह्यात १९९९ पासून घड्याळ हे चिन्ह पोचलेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होणे स्वाभाविक आहे.

सकाळ डिजिटल टीम

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना वाई विधानसभा (Wai Assembly) मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य देण्याचे आवाहनही दादांनी केले.

वाई : बहुजन समाजाला मदत करायची असेल, तर सत्तेत असले पाहिजे या भूमिकेतून आपण महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या जिल्ह्यात १९९९ पासून घड्याळ हे चिन्ह पोचलेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होणे स्वाभाविक आहे. मात्र येत्या जून-जुलैपर्यंत नितीन पाटील (Nitin Patil) यांना राज्यसभेचे खासदार करण्याची ग्वाही देतो. नाही केले तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी येथे सांगितले.

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना वाई विधानसभा (Wai Assembly) मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. वाई येथे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार मकरंद पाटील, नाशिक (मध्य)च्या आमदार देवयानी फरांदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, बकाजीराव पाटील, प्रताप पवार, भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम, अमित कदम, शशिकांत पिसाळ, मदन भोसले, दिलीप पिसाळ, श्रीमती विजयाताई भोसले, दीपक ओसवाल, राजेंद्र राजपुरे, दत्तानाना ढमाळ, महादेव मस्कर, विजय नायकवडी आदी प्रमुख उपस्थित होते.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘मकरंद पाटील यांनी मतदारसंघात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे. एवढा निधी उपलब्ध होतो तेव्हा त्या पाठीमागे स्थिर सरकार असते. महायुतीकडे विकासाचा निश्चित कार्यक्रम आणि नियोजन आहे.’’ मुंबई बाजार समितीत एकाच संस्थेत कोट्यवधीचा गैरव्यवहार करणाऱ्याला तुम्ही मतदान करणार का? असा प्रश्न त्यांनी केला.

आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘‘भुईंज आणि खंडाळा येथील किसन वीर साखर कारखान्याच्या ८५ हजार शेतकरी सभासदांच्या हितासाठी आपण महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली असून, महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मतदारसंघातून मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. तुम्ही सामान्य कार्यकर्ते वेडे वाकडे वागलात, तर मला जाब द्यावा लागणार आहे. अतिवृष्टीच्या काळातील महाबळेश्वर व वाई तालुक्यांतील रस्ते, पूल दुरुस्तीसाठी अजितदादा यांच्यामुळे मोठा निधी मिळाल्याची आठवण करून देऊन प्रगतीसाठी मकरंद पाटील खंबीर आहे. विकासाची चिंता माझ्यावर सोडा. मात्र, गडबड झाली तर लोक मला माफ करणार नाहीत, त्यामुळे उदयनराजे यांना मतदारसंघातून मताधिक्य द्या.’’

तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र लावंघरे, संजूबाबा गायकवाड, नितीन भरगुडे-पाटील, रिपाईचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांची भाषणे झाली. अनिल सावंत यांनी आभार मानले. सभेस वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘आधी लगीन...’च्या कोटीने हशा

मकरंद पाटील यांच्या पुतण्याच्या लग्नाचा उल्लेख करून हा बाबा आधी लगीन कोंढाण्याचे (निवडणुकीचे) करेल, असे वाटले होते. मात्र, त्यांनी आधी लगीन रायबाचे केले. आता त्यांनी व नितीन पाटील यांनी शिरस्त्याप्रमाणे पायाला भिंगरी लावून उदयनराजे यांच्या मताधिक्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. आधी लगीन या त्यांच्या कोटीने सभेत हशा पिकला.

अजित पवार म्हणाले...

  • आपण नको म्हणत असताना जनरेट्यामुळे मकरंद पाटील यांनी आर्थिक अडचणीत असलेले दोन कारखाने ताब्यात घेतले.

  • कारखान्यांच्या थकहमीचा प्रस्ताव मंजूर करून मदत करणार

  • वाई मतदारसंघात राज्य शासनाच्या माध्यमातून ११०० कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला आहे.

  • त्यास केंद्राची जोड असल्यास त्यामध्ये वाढच होईल.

  • मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेल्या राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्यावर बोफोर्स, स्पेक्ट्रम घोटाळ्याचे आरोप झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT