Udayanraje Bhosale Sharad Pawar Collar Style esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

उदयनराजे हेच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा, असे संकेत श्री. पवार यांनी दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

''शरद पवारांनी हे संकेत दिले आहेत, की त्यांनी दिलेला उमेदवार हा चुकीचा आहे. उदयनराजे हेच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा, असे संकेत त्यांनी दिलेले आहेत.''

सातारा : मी नेहमीच कॉलर उडवतो. त्यांनी दिलेला उमेदवार हा चुकीचा आहे. उदयनराजे हेच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा, असे संकेत श्री. पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे ते माझ्या निवडणुकीचे मुख्य प्रचारक म्हणून एवढ्या सभा सातारा लोकसभा मतदारसंघात ते घेत आहेत, अशी खोचक टीका खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केली.

वाई येथील सभेत खासदार शरद पवार यांनी ‘ते’ कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ आहे, हे बघावे लागते, अशी टीका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देताना उदयनराजे म्हणाले, ‘‘मी नेहमीच कॉलर उडवतो; पण मी लोकांच्या हिताच्या विरोधात काहीही केलेले नाही. मी सकाळी, दुपारी, पहाटे ब्रह्म मुहूर्तावर, नाईट सूटमध्ये आणि रात्री झोपेतसुद्धा कॉलर उडवतो.

शरद पवारांनी हे संकेत दिले आहेत, की त्यांनी दिलेला उमेदवार हा चुकीचा आहे. उदयनराजे हेच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा, असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे माझ्या निवडणुकीचे मुख्य प्रचारक म्हणून एवढ्या सभा शरद पवार या मतदारसंघात घेत आहेत. जेणेकरून जास्तीतजास्त मतांनी मी निवडून आलो पाहिजे.’’

उदयनराजे म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाणांचे विचार म्हणजे यशवंत विचार हे लोककल्याणाचे होते. भ्रष्टाचाराच्या बाजूने नव्हते. जे कोणी भ्रष्टाचाराचे समर्थन करत असतील त्यांचे यशवंत विचार असूच शकत नाहीत. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यासाठी काही पद्धत असते. ती या लोकांना माहीत नाही. त्यांना केवळ प्रोसिजर तोडून खायचे माहीत आहे. निकालानंतर यशवंतराव चव्हाण यांना पुरस्कार देण्याबद्दल निर्णय घेऊ. मोदींनी शब्द दिला आहे.’’

यशवंतराव चव्हाण यांचे जे मानसपुत्र म्हणून घेतात, त्यांना हा पुरस्कार देण्याचे याआधी का सुचले नाही? असा प्रश्न त्यांनी केला. लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात मागणी करत आहेत. ज्या माथाडींच्या जिवावर आजपर्यंत त्यांनी राजकारण केले, त्यांचा विसर पडला आहे. माथाडी तरुण माता-भगिनींना एकच विनंती आहे, की माथाडीचे नेते नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांनासुद्धा शशिकांत शिंदे यांनी माथाडी युनियनमधून बाजूला केले. त्यामुळे नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

विरोधकांना सहानुभूतीची लाट नाही

निवडणुकीमध्ये जिल्ह्याचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कृष्णा नदीचे शुद्धीकरण, आयटी पार्क काढणे, नवीन इंडस्ट्री आणणे अशाप्रकारचे मोठे मुद्दे आहेत. याबाबत आमचे बोलणे सुरू आहे. विरोधकांना कोणत्याही प्रकारची सहानुभूतीची लाट नाही. भ्रष्टाचार करायचा आणि मग आम्हाला माफ करा, असे म्हणायचे. त्यामुळे लोक शिष्टाचाराच्या बाजूने मतदान करतात. भ्रष्टाचाराच्या बाजूने करत नाहीत. यांना फक्त स्वतःच मत मिळेल. दुसऱ्यांचे मत मिळणार नाही आणि जी लोक मतदान करतील, त्यांनी पण भ्रष्टाचार केलाय, असे म्हणावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT