Udayanraje Bhosale Satara Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी भरली अनामत रक्कम; 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता

भाजपकडून (BJP) उमेदवारांच्या नावाच्या अकरा याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नाही.

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून उदयनराजेंनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा निरोप धनंजय मुंडे यांनी दिला होता.

सातारा : उमेदवारीबाबत संभ्रमाचे वातावरण असूनही खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी (Satara Lok Sabha Constituency) दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतला होता. काल (सोमवार) त्यांनी अर्जासोबत भरावी लागणारी अनामत रक्कमही भरली आहे. येत्या गुरुवारी (ता. १८) ते उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतर्फे भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार का, याची उत्सुकता आहे.

भाजपकडून (BJP) उमेदवारांच्या नावाच्या अकरा याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, या समर्थकांच्या नाराजीची दखल पक्षाने घेतलेली नाही. त्यामुळे भाजपने त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केला, तर ते अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज भरणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून उदयनराजेंनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा निरोप धनंजय मुंडे यांनी दिला होता. मात्र, उदयनराजे भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले. त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यामध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीकडून कधी अर्ज दाखल केला जाणार याची उत्सुकता आहे. त्यातच उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेचा उमेदवारी अर्ज खरेदी केला होता. आज त्यांच्या वतीने उमेदवारी अर्जासोबत भरावी लागणारी अनामत रक्कम भरण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांचेच नाव येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT