Satara Lok Sabha Constituency MP Udayanraje Bhosale 
लोकसभा २०२४

गेली तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंच्या उमेदवारीवर आज निर्णय; अमित शहा करणार शिक्कामोर्तब!

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उदयनराजेंच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची विनंती केली होती; पण उदयनराजेंनी हा प्रस्ताव अमान्य केला.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha Constituency) भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार उदयनराजे भोसले गेली तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. आज रात्री उशिरा दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत चर्चा होऊन महायुतीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उदयनराजेंच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा सांगितला होता, तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून कमळ चिन्हावरच लढण्यास इच्छुक होते; पण विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा अजित पवार गटाकडे जाणार होती.

दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उदयनराजेंच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा सांगितला होता, तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून कमळ चिन्हावरच लढण्यास इच्छुक होते; पण विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा अजित पवार गटाकडे जाणार होती.

शनिवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले. त्या वेळी त्यांनी खासदार उदयनराजेंची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार उपस्थित होते. भाजपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सातारा, गडचिरोली, परभणी या जागा भाजपकडे घेऊन तेथून भाजपच्या इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये साताऱ्यातून उदयनराजेंना संधी देण्याबाबत सर्व जण सकारात्मक असल्याने गृहमंत्री शहा हे यावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

त्यासाठी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मंत्री शहा यांच्याकडून शिक्कामोर्तब होण्याची सर्व जण वाट पाहात आहेत. त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय झाल्याने काहींनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

Ajit Pawar: विलासराव देशमुख हे उत्तम मुख्यमंत्री! आता CM पदाच्या शर्यतीत आहात का? अजित पवारांनी स्पष्ट केले मत

Chole Pattice Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार छोले पॅटिस, वीकेंडचा आनंद होईल द्विगुणित

तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड म्हमद्याचा गोळीबार आर्थिक वादातून; दोन तासांत आवळल्या चौघांच्या मुसक्या

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

SCROLL FOR NEXT