Satara Lok Sabha Devendra Fadnavis esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : 'ज्यानं शौचालयात पैसे खाल्लेत असा उमेदवार शरद पवारांनी दिलाय'; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

साताऱ्याच्या छत्रपतींच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार करून छत्रपतींच्या वंशजांना दिल्लीला पाठवा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील निर्धार मेळाव्यात केले.

सातारा : नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना साताऱ्याची शान व अभिमान असलेली खासदार उदयनराजे हे त्यांच्यासोबत दिसले पाहिजेत. कोल्हापुरात शाहू महाराजांना बिनविरोध द्यायला हवे होते, असे शरद पवार सांगत आहेत. मग साताऱ्यात छत्रपतींच्या वंशजाविरोधात उमेदवार का दिला? किमान उदयनराजेंच्या तोडीचा तरी उमेदवार त्यांनी द्यायला हवा होता. ज्याने शौचालयात पैसे खाल्लेत असा उमेदवार शरद पवार यांनी दिला आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

खासदार उदयनराजे त्यांच्या तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबणार नाहीत. त्यामुळे ही निवडणूक आम्ही सातारकरांच्या भवितव्यावर सोडली असून, साताऱ्याच्या छत्रपतींच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार करून छत्रपतींच्या वंशजांना दिल्लीला पाठवा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील निर्धार मेळाव्यात केले. महायुतीचे सातारा लोकसभेचे (Satara Lok Sabha) उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावरील निर्धार सभेत ते बोलत होते.

या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, मकरंद पाटील, महादेव जानकर, मदन भोसले, नितीन पाटील, अशोक गायकवाड, विजय नाफड, सुनील काटकर, अमित कदम, राजू भोसले, अमोल मोहिते, जयवंत भोसले, पुरुषोत्तम जाधव, वसंतराव मानकुमरे, नरेंद्र पाटील, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, प्रवीण साळे, ज्ञानदेव रांजणे, अमर साबळे, भीमराव पाटील, रामकृष्ण वेताळ, रणजित भोसले, सुरभी भोसले, रेणू येळगावकर, चित्रलेखा माने-कदम, गीतांजली कदम, रंजना रावत, माधवी कदम, बाळासाहेब गोसावी, धैर्यशील पाटील, राहुल पवार, चंद्रकांत जाधव, युवराज पवार, मनोज शेंडे आदींसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘विराट सभा पाहून मनात कुठलीही शंका नाही. चार जूनला गुलाल उधळण्यासाठी यावेच लागेल. साताऱ्यात अजून एक सभा सुरू आहे. बाबांना विचारलं किती आहेत, या कोपऱ्यात बसलेत तेवढी सभा तिकडे सुरू आहे. आपल्याकडे मात्र, मैदान भरून सभा सुरू आहे. साताऱ्यात आयटी पार्क, एमआयडीसी, वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विषय असून, या सगळ्या बाबींसाठी मोदीजींसोबत आपला प्रतिनिधी लागेल. आमच्या सोबत शिवेंद्रबाबा आहेत, त्यांची एक किल्ली तुमच्याकडे आहे. दुसरी देशाची किल्ली मिळवायची असेल तर उदयनराजेंना दिल्लीला पाठवावे लागेल. आज आपला प्रतिनिधी नसताना दहा हजार कोटींची कामे साताऱ्यात आणली आहेत.’’

उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘चार तारखेला लागणार निकाल यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. राजधानीतून अनेक चळवळींचा उगम झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५५ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. जनतेने त्यांना भरभरून मतदान केलं; पण त्यांनी देशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने परिवर्तन घडवलं. विकासकामांचा डोंगर उभा राहिला. मोदी यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दहा हजार कोटींची कामे मार्गी लावली. विकासाचा पर्व आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून केवळ भूलथापा देण्याचे काम झाले आहे. मी सामान्य माणूस असून, तुमची सुख, दु:ख ३२ वर्षे मी पाहिलेले आहेत. आता तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.’’

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘ही निवडणूक स्थानिक विषय बाजूला ठेऊन पंतप्रधान मोदींना दिल्लीच्या तख्तावर बसविण्यासाठी आहे. विरोधकांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करा, आपल्याला मोदींसारखे बलाढ्य नेतृत्व मिळाले आहे, विरोधकांच्या राजकारणाकडे बघण्याची गरज नाही.

मानकुमरे, शिंदे भाजपमध्ये

या वेळी जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे, सौरभ शिंदे, ओबीसी समाजाचे युवा नेते दत्तात्रय ऊर्फ पिंटू गुरव यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला, तसेच सदाभाऊ बागल व वीर लहुजी शक्ती सेनेचे बाळासाहेब जाधव, तसेच गुजराती समाजाने उदयनराजेंना पाठिंबा जाहीर केला. तसेच सागर भिसे, प्रवीण धस्के, संदीप शिंदे यांनी फडणवीस यांना संविधानाची प्रत भेट दिली.

तीन आमदारांमध्ये स्पर्धा

उदयनराजे भोसले यांचा अर्ज दाखल केल्यापासून महायुतीचा कुठलाही आमदार मते मागण्यात कमी पडला नाही. वाईचे आमदार मकरंद पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे व पाटण मतदारसंघ या तीन विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्य कोण देणार, यासाठी आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. आज वाई येथे झालेल्या अजित पवार यांच्या सभेने निवडणुकीतील वातावरण बदलले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले....

ही निवडणूक साधी नसून देशाची आहे.

देशाचा नेता निवडायचा आहे.

सामान्य माणसांच्या अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो तोच नेता निवडायचा आहे.

शरद पवार प्रधानमंत्री होणार नाहीत, तर उद्धव ठाकरेंचा प्रश्नच येत नाही.

महाराजांना मत दिल्यास मोदी यांना मिळतं.

तुम्ही ज्या क्षणी महाराजांच्या कमळाचे बटन दाबाल, त्याक्षणी साताऱ्याची बोगी मोदींच्या इंजिनला लागेल.

साताऱ्याला मागे वगळून पाहावे लागणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT