Satara Lok Sabha Election Police Car Accident esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : कराड तालुक्यातील विमानतळाजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात; 15 पोलीस कर्मचारी जखमी

हेमंत पवार, सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

ट्रॅव्हल्स विमानतळाजवळील एका ढाब्याजवळ आली असता, आयशर टेम्पो आडवा आल्याने अपघात झाला. त्यामध्ये ट्रॅव्हलच्या पुढील बाजूस बसलेले तीन कर्मचारी जखमी झालेत.

कराड : पाटण येथून निवडणुकीचा (Satara Lok Sabha Election) बंदोबस्त आटोपून निघालेल्या पोलिसांच्या खासगी आराम बसला झालेल्या अपघातात १५ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील तिघेजण गंभीर आहेत. कऱ्हाड-पाटण रस्त्यावरील येथील गोटे गावच्या हद्दीत सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला. संबंधित कर्मचारी तुर्ची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी आहेत.

संदीप पवार, लक्ष्मण सुतार व अजीत नलवडे अशी अतीदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अन्य जवळपास १५ पोलिस किकरोळ जखमी आहेत. खासगी आराम बस रस्त्याकडेच्या पडक्या घराला जावून धडकली. समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने अपघात झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः लोकसभा निवडणुकीतील बंदोबस्तासाठी तुर्ची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी पाटण येथे बंदोबस्तासाठी आले होते. बंदोबस्त आटोपून ते पुन्हा परत निघाले होते. कऱ्हाडनजीकच्या गोटो येथे येताच समोरून आयेशार ट्रक भरधाव आला. त्याने हुलकावणी दिल्याने पोलिसांच्या आराम बसच्या (एम. एच. ५०, एन - ५०२०) चालकाने ती चुकवणीसाठी रस्त्याच्या कडेला वाहन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आराम बस रस्त्याच्या कडेच्या गटारीसह पडक्या घराला धडकली.

Satara Lok Sabha Election Police Car Accident

त्यात जवळपास १५ कर्मचारी किरकोळ जखमी आहेत. त्यातील तीघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर कऱ्हाडच्या अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अन्य १५ कर्मचाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. त्यांना उपचार करून सोडण्यात आले आहेत. अपघाताची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी घटनास्थली भेट दिली. तेथून जखमींना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्यात आले. अपघातातील जखमींची अधीक्षक समीर शेख यांनी भेट देवून विचारपूस केली. दरम्यान, आराम बसला आडवा येणारा ट्रक व त्याच्या चालकासह ताब्यात घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT