Satara Lok Sabha election results  esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha Election Results : उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली, निकाल घटिका समीप; उत्सुकता शिगेला

सातारा लोकसभेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीचा निकाल मंगळवारी (ता. चार) लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नुकत्याच आलेल्या विविध एक्झिट पोलच्या अंदाजानंतरही दावे-प्रतिदावे सुरू असून, कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांमध्येही पैजांचा जोर वाढू लागला आहे.

सातारा : सातारा लोकसभेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीचा निकाल मंगळवारी (ता. चार) लागणार आहे. त्याला आता एकच दिवस उरल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य यात पणाला लागले आहे. निकालाला अवघे काही तास राहिल्याने कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. येणार तर आम्हीच, या विश्वासातून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

नुकत्याच आलेल्या विविध एक्झिट पोलच्या अंदाजानंतरही दावे-प्रतिदावे सुरू असून, कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांमध्येही पैजांचा जोर वाढू लागला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेस विचारसरणीसोबत राहिला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या जिल्ह्यातील मतदार शरद पवारांसोबत भक्कमपणे उभा राहिला. मागील लोकसभा पोटनिवडणुकीतही ते दिसून आले. यावेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे हक्काचा गड राखण्याचे आव्हान शरद पवार यांच्यासमोर होते. त्यातच श्रीनिवास पाटील यांनी आजारपणामुळे माघार घेतली.

दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांचे तिकीट भाजपकडून अंतिम होत नव्हते. त्यामुळे उमेदवार निवडीपासून या मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. अखेरीस उदयनराजे व आमदार शशिकांत शिंदे यांची नावे अंतिम झाली. त्यानंतर लढतीला खऱ्या अर्थाने धार आली. तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक हायव्होल्टेज झाली.

गुलाल आमचाच

उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या नेत्याच्या विजयासाठी रात्रंदिवस झटत होते. त्यामुळे आपल्याच नेत्याचा विजय होणार, असा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्यातूनच गुलाल आमचाच अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. काहींनी बॅनरही लावलेत. पैजांच्या माध्यमातून दावा पक्का असल्याचे दाखविले जात आहे.

जल्लोषाची तयारी

साताऱ्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली आहे. काहींनी ध्वनिक्षेपकही बुक करून ठेवले आहेत. मिरवणुकीसाठी गाडी सजविण्याची काहींची तयारी सुरू आहे. मिरवणूक कशी व कोठून काढायची, याचे प्लॅन केले जात आहेत. गुलालाचेही ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. दोन्ही बाजूंनी ही तयारी लपूनछपून होत आहे.

एक्झिट पोलनंतर जोर

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर विविध वाहिन्या व समाजमाध्यमावरून संपूर्ण देशाच्या निकालाचा अंदाज मांडण्यात आला. या निकालानंतर साताऱ्यातही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या चर्चांना जोर चढला आहे. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एक्झिट पोलच्या अंदाजांचे आपल्या पद्धतीने विश्‍लेषण करत आहेत. निकाल बाजूने असेल, तर समर्थनार्थ आणि विरोधी असेल तर तो कसा खोटा आहे, हे सांगण्यासाठीची मांडणी केली जात आहे.

अंतिम निकालापर्यंत ड्राय डे

मतमोजणीदरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागानेही मंगळवारी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत मद्य विक्री बंद राहणार असल्याचे सांगितले.

दोन्ही उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला

उदयनराजे भोसले यांना २०१९ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर शशिकांत शिंदे यांना विधानसभेला मात मिळाली होती. त्यानंतर दोघांचाही राजकीय संघर्ष सुरू होता. ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दोघांचेही राजकीय अस्तित्व या निवडणुकीमध्ये पणाला लागले होते. दोघे लढलेही त्याच त्वेषाने. त्यामुळे निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाल्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष मंगळवारकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT