Satara Lok Sabha MP Udayanraje Bhosale esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भाजपने सर्वात जास्त आचरणात आणले - खासदार उदयनराजे

भाजपचे केवळ दोनच खासदार होते. मात्र, आता देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

माझी पक्षापेक्षा तत्त्वावर निष्ठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) विचार भाजपने सर्वात जास्त आचरणात आणले आहेत.

सातारा : माझी पक्षापेक्षा तत्त्वावर निष्ठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) विचार भाजपने सर्वात जास्त आचरणात आणले आहेत. तुतारी चिन्ह कोणी तरी घेतलं आहे. पूर्वीच्या काळात आमच्या वाड्यात तुताऱ्या असायच्या. कुठंही लग्नाला गेलं, तर तुतारी असतेच. त्यामुळे चिन्ह चांगलं असलं, तरी मला दुसऱ्या पक्षावर भाष्य करायचे नाही, अशी खोचक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्‍या राष्‍ट्रवादी गटाच्‍या तुतारी चिन्हाबाबत केली.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर नमो ॲपच्या माध्यमातून त्यांनी पक्षास देणगी पाठवली. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर गोडबोले, रवींद्र आपटे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे, मनीषा पांडे, सांस्कृतिक आघाडीचे पंकज चव्हाण, धनंजय पाटील, मनीष महाडवाले, राहुल शिवनामे, डॉ. सचिन साळुंखे, शहराध्यक्ष विकास गोसावी, सोशल मीडिया संयोजक रवींद्र लाहोटी, अनुसूचित जाती मोर्चाचे अमित भिसे, वैष्णवी कदम, रीना भणगे, अश्विनी हुबळीकर, कल्पना जाधव, उज्वला खंदारे, रोहिणी क्षीरसागर आदी उपस्थित होते. यानंतर उदयनराजेंशी पत्रकारांनी संवाद साधला.

भाजपवर लोकांचा विश्वास...

उदयनराजे म्हणाले, एक काळ असा होता, की भाजपचे केवळ दोनच खासदार होते. मात्र, आता देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख झाली आहे. कोणताही भेदभाव येथे केला जात नाही. या पक्षात वशिल्याची गरज नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम या पक्षात केले जाते. यामुळेच पक्षाबाबत लोकांच्या मनात विश्‍‍वास निर्माण झाला आहे. बाकीच्या पक्षांची आयडॉलॉजी चुकीची आहे, असे मी म्हणणार नाही. मात्र, त्या पक्षांनी सर्वसामान्यांना न्याय दिला असता, तर ते पक्ष सुद्धा मोठे झाले असते.

साताऱ्यातून तडजोडी होतात...

उमेदवारीबाबत पुन्‍हा एकदा छेडले असता, उदयनराजेंनी सारखंसारखं तिकिटाचा विषय कशाला काढता, असे म्हणत, एक करा कसलं तिकीट पाहिजे. मला तुमची शंका येते. तुम्ही मला तिकीट लावून लांब कुठं तरी कुरिअर करण्याचे तुमच्या डोक्यात दिसते; पण मी एवढा सोपा नाही, असे ठणकावत त्यांनी तिकिटाचा विषयही होऊन जाईल, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्यात अनेक चळवळी झाल्या. या जिल्ह्याने देशाला, महाराष्ट्राला दिशा दिली. त्याप्रमाणे प्रत्येकाचा गनिमी कावा असतो. शेवटी साताऱ्यावर बोट ठेवलं, की बाकीच्या तडजोडी होत राहतात. साताऱ्याची ही आगळीवेगळी ओळख आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT