Satara Lok Sabha 2024 esakal
लोकसभा २०२४

पराभव दिसत असल्‍याने माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न; शशिकांत शिंदेंचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

पोलिस विभागाला बरोबर घेऊन काही जणांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे (Atrocity Crime) दाखल करून खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी सुरू केला आहे.

सातारारोड : लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये (Satara Lok Sabha) मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर पराभवाच्या भीतीने किंवा विरोधात मतदान केले म्हणून प्रशासनाला हाताशी धरून कोरेगाव मतदारसंघातील आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून अन्यायकारकरीत्या कारवाई करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. निवडणूक झाल्यानंतर कोरेगाव मतदारसंघातील आमच्या विरोधकांना पराभव दिसू लागल्याने त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून हा रडीचा डाव सुरू केला आहे. अशा दडपशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

यासंदर्भातील पत्रकात आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी म्हटले आहे, की पोलिस विभागाला बरोबर घेऊन काही जणांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे (Atrocity Crime) दाखल करून खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी सुरू केला आहे. त्यात कोरेगाव, पिंपोडे येथील केसेसचा समावेश आहे. मुद्दाम तक्रार करायला लावून आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांवर दबाव टाकून असे प्रकार सर्रास कोरेगाव मतदारसंघातील कोरेगाव व पुसेगाव पोलिस (Koregaon and Pusegaon Police) ठाण्याच्या हद्दीत सुरू झाले आहेत. त्यावरून अधिकारी, कर्मचाऱ्यांना आचारसंहितेची भीती राहिली आहे की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

पोलिस आणि प्रशासन पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या अधीन राहून काम करत असून, हे सर्व चुकीचे आहे. सत्तेच्या दबावाखाली किती राहायचे, सत्ता येते आणि जाते. परत आमची सत्ता आल्यानंतर काय करणार? असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

आचारसंहितेतही अविश्‍‍वास ठराव

रेवडी येथील चेअरमन यांनी विरोधात काम केले म्हणून आचारसंहिता असतानाही तेथील संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आणि त्यावर सहायक निबंधकांनी देखील तत्काळ दोन दिवसांत कार्यवाही करून अविश्वास ठराव मंजूर देखील केला. आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारची कार्यवाही करणे योग्य आहे का? प्रशासनाने किती आहारी जावे? हा आचारसंहितेचा भंग आहे.

त्याबाबत आम्‍ही निवडणूक आयोगाकडे संबंधितांवर कारवाई करण्‍याची मागणी करणार आहे. निवडणूक आयोग गांभीर्याने दखल घेईल, अशी अपेक्षा आहे. कारवाई न झाल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने आवाज उठवणार आहोत. त्यानंतरही दखल घेतली न गेल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून अशा दडपशाहीच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT