Satara Lok Sabha Udayanraje Bhosale esakal
लोकसभा २०२४

उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पुन्हा लांबणीवर; सलग दुसऱ्या दिवशीही राजेंना मिळाली नाही अमित शहांची भेट

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संभाव्य यादी सोशल मीडियावर जाहीर झाली.

सकाळ डिजिटल टीम

सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. महायुतीत अजितदादांची राष्ट्रवादी व भाजपचे उदयनराजे यांच्यात एकमत होत नाही.

सातारा : महायुतीकडून सातारा लोकसभा मतदारसंघाची (Satara Lok Sabha Constituency) उमेदवारी मिळावी, यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची सलग दुसऱ्या दिवशीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संभाव्य यादी सोशल मीडियावर जाहीर झाली. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघासाठी कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) किंवा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील असे दोन पर्याय ठेवले आहेत. त्यामुळे सातारा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजे भोसले किंवा नितीन पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटील किंवा बाळासाहेब पाटील अशीच लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. महायुतीत अजितदादांची राष्ट्रवादी व भाजपचे उदयनराजे यांच्यात एकमत होत नाही. यातूनच उमेदवारी मिळविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. आजही त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता वाढली आहे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संभाव्य उमेदवारांची यादी आज सोशल मीडियावर व्हायरल झाली.

यामध्ये साताऱ्यासाठी कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील किंवा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. महायुतीने जर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांनाच रिंगणात उतरविले जाण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सोडल्यास त्यांच्याकडून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे उमेदवार असतील, तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील यांचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

श्रीनिवास पाटील यांचा सातारा लोकसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून, गावागावात त्यांनी विविध विकासकामे केलेली आहेत, तसेच ते पक्ष, संघटना यापेक्षा मतदारसंघातील निमंत्रण देणाऱ्या प्रत्येकाच्या लग्न समारंभास, तसेच मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहतात. त्यामुळे एक आश्वासक व अनुभवी चेहरा तसेच शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, तर बाळासाहेब पाटील हे उमेदवार असतील तर त्यांचाही कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण व पाटणमधून चांगले मताधिक्य मिळू शकते.

सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून कऱ्हाड, कोरेगाव, सातारा तालुक्यांत त्यांचा संपर्क आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सहानुभूतीचा फायदा होणार असल्याने या संभाव्य उमेदवारांचे भवितव्य सध्यातरी चांगले असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोशल मीडियावर टाकलेल्या या संभाव्य यादीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अद्याप कोणीकडूनही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही यादी खरी की खोटी याबाबत संभ्रम आहे.

संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार : बारामती- सुप्रिया सुळे, माढा- महादेव जानकर (रासप), सातारा- श्रीनिवास पाटील किंवा बाळासाहेब पाटील, शिरूर- डॉ. अमोल कोल्हे, नगर दक्षिण- नीलेश लंके, बीड- बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे, वर्धा- अमर काळे.

  • शरद पवारांच्या संभाव्य यादीत श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील यांची नावे

  • यादी समाज माध्यमावर जाहीर, मात्र अधिकृत दुजोरा नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT