Satara Lok Sabha voting karad congress leader Prithviraj Chavan esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : साताऱ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल; माजी मुख्यमंत्र्यांना विश्वास

हेमंत पवार

सातारा लोकसभा मतदारसंघात विशेषत: कराड दक्षिणमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला.

कराड : लोकशाहीचा उत्सव दर पाच वर्षांनी साजरा होतो, त्यावर एक गडद छाया यावेळी आहे. या देशात लोकशाही अस्तित्वात राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल थांबवण्यासाठी आज देशातील जनता सज्ज झालेली आहे. यावेळी जनता इंडिया आघाडीला साथ देऊन देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील नगरपालिका शाळेत आज मंगळवारी कुटुंबीयासमवेत मतदान केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी कुठे दहशत, अमिषे, कुठे पद देतो, कर्ज देतो असे अमिषे दाखवली असली तरी या विरोधी पक्षाच्या खासदाराला तीन वेळा यापूर्वी जनतेने निवडून दिलेले आहे. त्यांची बारा वर्षाची कारकीर्द लोकांच्या समोर आहे. त्यामुळे मागच्यापेक्षा या वेळेला सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल.

ते म्हणाले, भाजपने कॅशलेस करप्शन केले आहे, त्यामुळे त्यांना नोटांची गरज भासत नाही. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून नोटाशिवाय करप्शन करण्याचा विक्रम भाजपने केला आहे. त्यामुळे त्यांना नोटांची गरज आता भासत नाही. पूर्वी भासत होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर परखड मत मांडले आहे. भाजपला सत्तेत राहण्याची संधी सध्या मिळणार नाही. देशात सत्तांतर होणार आहे.''

बारामतीत मोदींचे बॅनरवरील फोटो हटवावे लागले

नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या संदर्भात जी वाक्य वापरली ती वापरायला नको होती. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. बारामतीमध्ये लावलेले पंतप्रधानांचे फोटो असलेले बॅनर अजित पवारांना काढावे लागले. मोदींकडून खालच्या पातळीवर झालेला प्रचार महाराष्ट्रातील जनतेला रुचलेला नाही. नरेंद्र मोदींना आता पराभव स्पष्ट दिसत आहे.

कराड दक्षिणमध्ये पैशाचा भाजपकडून वापर

सातारा लोकसभा मतदारसंघात विशेषत: कराड दक्षिणमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण म्हणाले, त्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या हेल्पलाइनवर तक्रार केले आहेत. मोदींच्या सभेला पैसे देऊन माणसं आणली होती. भाजपकडून सत्तेत राहण्यासाठी पैशाचा वापर केला जात आहे. मात्र, जनता त्याला साथ देणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT