PM Modi Slam Congress Over Supreme Court verdict on VVPAT Reservation Marathi News Lok Sabha election 2024  
लोकसभा २०२४

Modi Hate Speech: PM मोदींवर सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी घाला! सुप्रीम कोर्टाकडून याचिकेची दखल घेण्यास नकार

मोदींनी हेटस्पीच आणि आदर्श आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मागणी संबंधित याचिकेत करण्यात आली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक सहभाग घेण्यास बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची दखल घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. मोदींनी हेटस्पीच आणि आदर्श आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मागणी संबंधित याचिकेत करण्यात आली होती.

न्या. विक्रम नाथ आणि न्या. एससी शर्मा यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्याला सांगितलं की त्यांनी त्यांची तक्रार संबंधित यंत्रणेकडं दाखल करावी. (SC refuses to entertain plea seeking ban on PM Narendra Modi from elections)

खंडपीठानं याचिकाकर्त्यांना विचारलं की, तुम्ही आपली तक्रार घेऊन निवडणूक संबंधित यंत्रणेकडं गेला होतात का? गेला नसाल तर पहिल्यांदा तुम्ही त्या यंत्रणेकडं जाणं आवश्यक आहे. यानंतर याचिकार्त्यानं स्वतःच आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळं सुप्रीम कोर्टातील हे प्रकरणं आपोआप रद्द झालं आहे. फातिमा नामक एका महिलेनं याबाबत याचिका दाखल केली. अॅड. आनंद जोंधळे यांनी याचिकाकर्त्याच्यावतीनं ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

याचिकात काय म्हटलं होतं?

या याचिकेत मागणी करण्यात आली होती की, सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत की, प्रचारादरम्यान हेटस्पीच तसेच आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी लोकप्रतिनीधी कायद्यांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहा वर्षांसाठी निवडणुकीवर बंदी घालण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT