Lok Sabha Election  Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election : ज्येष्ठांसह दिव्यांगांनी घरातूनच केले मतदान; दोन हजारांहून अधिक जणांनी बजावला हक्क

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मुंबई उपनगरात ४ लोकसभा मतदारसंघांत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा २ हजार ७३५ मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केलेली.

त्यापैकी २ हजार २९० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला; तर मुंबई शहरात १ हजार २६४ ज्येष्ठ नागरिक आणि ७२ दिव्यांग अशा १ हजार ३३६ मतदारांनी गृहमतदान केले.

काय होती सुविधा

ज्या मतदारांचे ८५ वर्षांपेक्षा जास्त वय आणि जे दिव्यांग होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले. मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया समजावून सांगत बॅलेट पेपरच्या माध्यमातून त्यांच्याकडून मतदान करून घेतले. त्यानंतर गोपनीयतेमुळे ते सीलबंद केले. या सर्व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले.

विक्रोळी पश्चिमेला डोंगर वस्त्यांमध्येही लोक राहतात. त्यांच्यासाठी प्रबोधन करणे, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता लोकशाही पद्धतीने मतदानाचे महत्व त्यांना पटवून दिले. या सर्व प्रक्रियेत अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांनीही मोलाची भूमिका बजावली.

- गीता गायकवाड, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT