Shirur Lok Sabha amol kolhe tutari vs Shivajirao Adhalrao-Patil NCP sakal
लोकसभा २०२४

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Shirur Lok Sabha : शिरूर लोकसभा मतदार संघासाठी चुरशीने मतदान झाल्यानंतर कुणाची सरशी होणार आणि.....

नितीन बारवकर

Shirur Lok Sabha : उज्ज्वल भवितव्यासाठी देशाचे नेतृत्व पुन्हा नरेंद्र मोदींच्या हाती देण्यासाठीचे आवाहन... ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संघर्षाला पाठिंब्यासाठीची साद...शेती आणि शेतकरी वर्गाच्या झालेल्या वाताहातीचा संताप...देशाची सुरक्षा आणि सर्वांगिण विकासासाठीचा अजेंडा...शिरूर लोकसभा मतदार संघासाठी चुरशीने मतदान झाल्यानंतर कुणाची सरशी होणार आणि कोण तोंडघशी पडणार याबाबत, आपापले मुद्दे प्रभावीपणे मांडून आडाखे बांधले जात आहेत. मतदार हुशार असल्याने भल्याभल्यांचे अंदाज चुकणार असून, ‘घड्याळ चालणार की तुतारी वाजणार’ अशा चर्चांनी जोर धरला आहे.

शिरूर मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील या आजी- माजी खासदारांत प्रत्यक्षात कॉंटे की टक्कर झाली असली तरी ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदार संघात पारंपारिक लढतीत प्रचारापासून सुरू झालेली चुरस मतदानापर्यंत कायम राहिली. उमेदवारी, प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानातील चुरशीमुळे विजयाचा कौल कुणाला मिळणार, याचा अंदाज भल्याभल्यांना येऊ शकलेला नाही.

या अनुभवी उमेदवारांत कोण बाजी मारणार, याबाबत वेगवेगळे तर्क- वितर्क लढविले जात आहेत. दोन्ही बाजूचे उमेदवार, स्थानिक नेते, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या विजयाचा दावा करीत असले तरी राजकीय तज्ज्ञ आणि निवडणुकांतील धुरीण मात्र ठामठोक बोलायला तयार नाहीत. शिरूरसह, आंबेगाव, खेड, जुन्नर हे ग्रामीण तर हडपसर व भोसरी या शहरी भागाचा समावेश असलेल्या या संमिश्र जनभावनेच्या मतदार संघातील निकालाचा अंदाज बांधणे बहुतेकांना कठीण जात आहे.

गतवेळच्या निवडणुकीत शहरी भागातून आढळराव पाटील यांना काहीसा दिलासा मिळाला होता, तर ग्रामीण भागाने डॉ. कोल्हे यांना उत्स्फूर्तपणे उचलून धरले होते. गतवेळच्या निवडणुकीत ६०.६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी ५४.१६ वर येऊन ते थांबले. मतांचा टक्का घसरला असला तरी मतदारसंख्येतील निर्णायक वाढ आणि नवमतदारांनी आपल्या पसंतीची माळ कुणाच्या गळ्यात घातली यावर निकाल ठरणार आहे.

हडपसरची साथ कोणाला?

सर्वाधिक मतदार असलेल्या हडपसर मतदारसंघात उर्वरित पाच मतदारसंघाच्या तुलनेत सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली. मतदानाचा घसरलेला हा टक्का, मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरलेले सोसायटीतील मतदार आणि याद्यांमधील घोळ नेमका कुणाचा विश्‍वास सार्थ ठरवेल, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातून ४७.८४ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांना मिळालेली आघाडी पाच-सहा हजारांवर आणून ठेवली होती.

या वेळी या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरून तो ४७.७१ वर आला आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघातील लढाई पुन्हा अटीतटीची झाली आहे. मतदारसंघातील सुमारे सव्वा लाख मुस्लिम समाज व ७० हजारांवरील माळी समाज महत्त्वाचा ठरणार आहे. मतदार याद्यांमधील घोळ आणि उन्हाचा तडाखा, सामान्य मतदारांना बाहेर पडण्यास केलेली टाळाटाळ यामुळे मतदानाचा टक्का घसरलेला दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT