Shiv Sena MP Sanjay Raut esakal
लोकसभा २०२४

Sanjay Raut : 'गद्दारी केलेल्या प्रत्येकाचा निवडणुकीत सुफडासाफ होईल, धैर्यशील मानेही लोकसभेत दिसणार नाहीत'

धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे उद्याच्या लोकसभेत दिसणार नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

‘एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण पळविले, पण भाजपवाले धनुष्यबाण आता औषधालाही ठेवणार नाहीत. त्यानंतर शिंदे गटालाही ते ठेवणार नाहीत.'

इचलकरंजी : ‘महाराष्ट्रात गद्दारी केलेल्या प्रत्येकाचा या निवडणुकीत सुफडासाफ होईल. यातील धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे उद्याच्या लोकसभेत दिसणार नाहीत. महाआघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या उमेदवारीला मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून, शिवसेनेची मशाल धगधगणार आहे,’ असा दावा उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

सांगली दौऱ्यावर आलेले राऊत हे काल रात्री इचलकरंजीत दाखल झाले. त्यानंतर रोटरी मानव सेवा केंद्रात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. पण, शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे.

हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा व मशाल चिन्हावर लढविण्याचा दोन्ही प्रस्ताव त्यांनी नाकारले. हातकणंगलेच्या जागेवर ठाम राहत सत्यजित पाटील यांच्यासारख्या निष्ठावंताला संधी देत तगडा उमेदवार दिला आहे. तिरंगी लढत असली तरी मतांची विभागणी न होता आमचा विजय सहजसोपा होणार आहे.’

पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, ‘इचलकरंजीच्या पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहतील, अशी भाषा त्यांनी केली होती, पण एक पाय तुरुंगात असताना ही भाषा त्यांना शोभत नाही. इचलकरंजीच्या पाण्याची जबाबदारी त्यांची आहे. वास्तविक पाण्याच्या प्रश्नावर निवडून आलेले खासदार माने यांनी हा प्रश्न सोडविला पाहिजे होता. सांगलीच्या जागेबाबत कोणताही तिढा नाही.’

शिंदे गटावर टीका

‘एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण पळविले, पण भाजपवाले धनुष्यबाण आता औषधालाही ठेवणार नाहीत. त्यानंतर शिंदे गटालाही ते ठेवणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी कोल्हापुरात आले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. राज्यात महाविकास आघाडी ३५ पेक्षा जादा जागा जिंकेल, हे आता लोकांनी ठरविले आहे, तर मोदी देशात २०० जागा पार करणार नाहीत. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत फसवणूक करणाऱ्या भाजपचे भाकीत त्यांच्यापेक्षा मला जास्त माहीत असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT