Shrikant Shinde sakal
लोकसभा २०२४

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे पक्षवाढीचे काम करणार,मुख्यमंत्री;शिवसेना खासदारांच्या ठरावावर स्पष्टीकरण

डॉ. श्रीकांत शिंदे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करा, असा ठराव शिवसेनेच्या खासदारांनी शनिवारी केला. पण, ‘असे काहीही घडणार नसून, श्रीकांत पक्षाचे काम करेल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : डॉ. श्रीकांत शिंदे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करा, असा ठराव शिवसेनेच्या खासदारांनी शनिवारी केला. पण, ‘असे काहीही घडणार नसून, श्रीकांत पक्षाचे काम करेल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितले.

श्रीकांत शिंदे यांना मंत्री करावे, असे पक्षाचे सर्व खासदार, तसेच आमदार, मंत्र्यांना वाटते, असे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि धैर्यशील माने यांनी सांगत ठराव मंजूर केला. हा ठराव होताच मुख्यमंत्र्यानी लगेचच त्यांची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे त्यांचे पुत्र आदित्य यांना राज्यात मंत्री केले तसे वागायचे नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. पक्षातील सर्वांत ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्री केले जाणार असल्याचे विश्वसनीयरित्या समजते.

मराठा समाजाला शांत करण्यासाठी औरंगाबादचे खासदार संदिपान भुमरे यांचे नावही समोर येऊ शकते. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी कायमच घराणेशाहीला विरोध केला आहे. त्यामुळे श्रीकातला मंत्री करण्याचा प्रस्ताव देणे भाजपला आवडले नसते याची मुख्यमंत्र्यांना चांगलीच कल्पना आहे.

शिवाय आपण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवायचे असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुलाचे नाव समोर करणे केवळ टाळलेच असे नाही तर तसा ठराव करणाऱ्यांना समजही दिली, असे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे निवडून येताच त्यांना मंत्री करणे हे तत्कालीन एकत्रित शिवसेनेच्या आमदारांचा रोषाचा विषय झाला होता, असे आताच्या शिवसेनचे म्हणणे आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणूक जिंकला आहे. त्याची कामगिरीही चांगली आहे. त्याला मंत्रिपदाची लालसा नाही. पक्षाच्या कामातच स्वारस्य असल्याचे त्यानेही स्पष्ट केले आहे. श्रीकांतने शिवसेना पक्षवाढीसाठी वेळ द्यावा, असे माझेही मत आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘मी मंत्रिपदास उत्सुक नाही’

‘‘मंत्रिपदासाठी मी उत्सुक नाही. गेली दहा वर्षे मी संसदेचे कामकाज पाहत आहे. आता शिवसेनेचा गटनेता म्हणून सोपविण्यात आलेले काम सांभाळेन,’’ असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT