Since first general election held in 1951 till now electoral environment has undergone tremendous changes Sakal
लोकसभा २०२४

लोकसभा निवडणूक तेव्हा आणि आता...

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात १९५१ या वर्षी झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते आतापर्यंत निवडणुकीच्या वातावरणात प्रचंड बदल झाले आहेत. राजकीय पक्षांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. पहिल्या निवडणुकीवेळी २९ पक्षांनी ‘राष्ट्रीय’ दर्जा देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात १४ पक्षांनाच हा दर्जा मिळाला. निकालानंतर मात्र केवळ चारच पक्षांना हा दर्जा टिकवता आला.

वर्ष १९५१

  • निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजकीय पक्ष : ५३

  • एकूण राष्ट्रीय पक्ष : १४

  • निवडणुकीनंतर केवळ काँग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि जनसंघ हेच चार पक्ष ‘राष्ट्रीय’ ठरले.

  • अखिल भारतीय हिंदू महासभा, अखिल भारतीय जनसंघ, क्रांतिकारी समाजवादी पार्टी, अखिल भारतीय अनुसूचित जाती संघटना, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी), अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक (रुईकर गट), कृषिकर लोक पक्ष, बोल्शेव्हिक पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय क्रांतिकारी कम्युनिस्ट पार्टी यांनी राष्ट्रीय दर्जा गमावला.

  • समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर पक्ष हे निवडणुकीनंतर एकमेकांत विलीन होऊन प्रजा समाजवादी पक्ष स्थापन.

पक्षांमधील प्रमुख घडामोडी

  • २०१४ पर्यंत सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा प्रभाव

  • दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुकीत भाकप हा प्रमुख विरोधी पक्ष

  • १९६४ मध्ये भाकपमध्ये सोव्हिएत आणि चिनी साम्यवाद्यांचे गट फुटून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उदय झाला. देशात अजूनही भाकप पेक्षा माकपचा अधिक प्रभाव.

  • जयप्रकाश नारायण आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत भारतीय लोकदलाची स्थापना केली. आणीबाणीनंतर यांच्यासह देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना केली. भाजप, समाजवादी पक्षासह अनेक पक्षांची मूळे याच जनता पक्षात.

निवडणूक लढविणारे पक्ष

  • १९५१ - ५३

  • १९५७ - १५

  • १९६२ - २७

  • १९९८ - १७६

  • १९९९ - १६०

  • २०१४ - ४६४

  • २०१९ - ६७४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT