Sivaganga Lok Sabha Result esakal
लोकसभा २०२४

Sivaganga Lok Sabha Result : काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांच्या मुलाने AIADMK उमेदवाराचा तब्बल 205664 मतांनी केला पराभव

शिवगंगा ही जागा तामिळनाडूमधील लोकप्रिय लोकसभा जागांपैकी एक आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवगंगा जागा ही तमिळनाडूच्या हायप्रोफाईल लोकसभा जागांपैकी एक आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम 7 वेळा येथून खासदार राहिले आहेत.

Sivaganga Lok Sabha Result : शिवगंगा ही जागा तामिळनाडूमधील लोकप्रिय लोकसभा जागांपैकी एक आहे. येथे काँग्रेसचे कार्ती चिदंबरम यांनी AIADMK उमेदवार झेवियर दास यांचा 205664 मतांनी पराभव केला. कार्ती चिदंबरम यांना 427677 आणि दास यांना 222013 मते मिळाली. भाजपचे उमेदवार डॉ. देवनाथन यादव 195788 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

शिवगंगा जागा ही तमिळनाडूच्या हायप्रोफाईल लोकसभा जागांपैकी एक आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम 7 वेळा येथून खासदार राहिले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना वडिलांच्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. मात्र, पुन्हा एकदा काँग्रेसनं कार्ती चिदंबरम यांना या जागेवर उभं केलं. तर, भाजपनं येथून एच. राजा यांना उमेदवारी दिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एच. राजा तिसऱ्या क्रमांकावर होते.

शिवगंगा लोकसभा जागेसाठी 26 उमेदवार रिंगणात होते. 18 एप्रिलला मतदान झालं. या लोकसभा जागेवर काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत होती. कारण, तामिळनाडूमध्ये भाजपची एआयएडीएमकेसोबत युती आहे, तर काँग्रेसची द्रमुकसोबत आहे.

शिवगंगा लोकसभा मतदारसंघ अनेक दशकांपासून काँग्रेसकडं आहे. पण, 2014 च्या निवडणुकीत AIADMK नं बाजी मारली आणि येथून विजय मिळवला. एआयएडीएमकेचे पीआर सेंथिलनाथन येथून खासदार आहेत. या लोकसभा जागेच्या कक्षेत विधानसभेच्या 6 जागा येतात.

2014 च्या निवडणुकीत AIADMK नं मिळवला विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत AIADMK नं येथून विजय मिळवला होता. पीआर सेंथिलनाथन येथून खासदार आहेत. त्यांना 4,75,993 मते मिळाली. द्रमुकचे ज्येष्ठ नेते रा. ध्रुवई दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 2,46,608 मते मिळाली. 2014 मध्ये कार्ती चिदंबरम या जागेवर चौथ्या स्थानावर होते.

शिवगंगा जागेचा इतिहास

शिवगंगा लोकसभा जागा 1967 मध्ये अस्तित्वात आली. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये (1967-1971) द्रमुकने येथून विजय मिळवला, त्यानंतर 1977 मध्ये AIADMK नं ही जागा ताब्यात घेतली. 1980 मध्ये आर स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला या जागेवर पहिल्यांदा विजय मिळवून दिला.

त्यानंतर 1999 वगळता 1984 ते 2009 या काळात पी. चिदंबरम यांनी ही जागा जिंकली. पी. चिदंबरम यांनी ही जागा काँग्रेसच्या तिकिटावर 5 वेळा आणि त्यांच्या तामिळ मनिला काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा जिंकली. मात्र, 2009 मध्ये पी. चिदंबरम यांच्या विजयावरून वाद निर्माण झाला होता. मतमोजणीच्या 21 फेऱ्यांमध्ये आर. एस. राजा विजयी झाले होते. पण, काँग्रेसच्या आक्षेपानंतर पुन्हा मतमोजणी झाली आणि चिदंबरम थोड्याच फरकानं विजयी झाले. चिदंबरम यांनी 1996 मध्ये तामिळ मनिला काँग्रेस पक्षाची स्थापना केली, ज्यातून कार्ती यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली. नंतर चिदंबरम यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

खासदाराचं रिपोर्ट कार्ड

पी. आर. सेंथिलनाथन यांचा जन्म शिवगंगाच्या नागडी गावात झाला. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली व्यवसायाशी संबंधित होते. सेंथिलनाथन यांनी 1988 मध्ये AIADMK पक्षात प्रवेश केला. 16 व्या लोकसभेत AIADMK खासदारांची संसदेत 69 टक्के उपस्थिती होती. त्यांनी 46 वादविवादांमध्ये भाग घेतला आणि 488 प्रश्न विचारले.

शिवगंगा लोकसभा जागेचं जातीचं गणित

शिवगंगा लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदार सर्वाधिक आहेत. गेल्या जनगणनेनुसार, येथील ग्रामीण मतदारांची संख्या सुमारे 1,165,893 म्हणजेच 75.2 टक्के आहे तर शहरी मतदारांची संख्या सुमारे 384,497 म्हणजेच 24.8 टक्के आहे. शिवगंगा लोकसभा मतदारसंघाचे जातीय गणित पाहिल्यास येथे अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या 254,264 म्हणजे सुमारे 16.4 टक्के आहे, तर मुस्लिम मतदारांची संख्या 6.06 टक्के आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या 5.26 टक्के आहे. 2019 च्या संसदीय निवडणुकांनुसार, शिवगंगा संसदेच्या जागेवर एकूण 1550390 मतदार होते आणि 1857 केंद्रांवर 69.7 टक्के मतदान झाले.

शिवगंगा लोकसभा मतदारसंघाची काय आहे ओळख?

इथली मोठी ओळख म्हणजे ग्रेफाइट. हे येथे मुख्य स्त्रोत आहे. शिवगंगा आणि आसपासच्या परिसरात मौल्यवान ग्रेफाइट सापडतो. इमारती आणि मंदिरांच्या बांधकामात याला मोठी मागणी आहे. तमिळनाडूची शिवगंगा खनिजे, विणकाम आणि धातूवर आधारित उद्योगांसाठीही प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT