लोकसभा २०२४

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

महेश पाटील

सलगर बुद्रुक (जिल्हा सोलापूर) : महाविकास आघाडीच्या काळात मला मंत्रीपदाची संधी होती, मी मंत्रिपद घेतले नाही अन् मंत्रीपदासाठी लॉबिंगही केले नाही. मी राजकारणात सत्तेसाठी अन् टक्केवारी घेण्यासाठी आले नाही. जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आहे, असे उद्गार प्रणिती शिंदे यांनी सलगर बुद्रुक येथे प्रचार दौऱ्यानिमित्त काढले. सलगर परिसरातील आठ ते दहा गावातील मतदारांची बैठक सलगरमध्ये बोलावण्यात आली होती. त्यावेळेस भर उन्हातही लोकांची लक्षणीय उपस्थिती होती.

प्रणिती शिंदे यांनी बोलताना अनेक मुद्दे मांडले.त्या म्हणाल्या की,भाजपाने गेल्या दोन निवडणुकीत दोन वेगवेगळे उमेदवार दिले. अन् आता परका उमेदवार आणला आहे.देशात मोदींची सत्ता असताना देखील दर लोकसभेला उमेदवार बदलावा लागतोय हे भाजपाचे अपयश आहे.त्यांच्याच उमेदवारांवर त्यांचा विश्वास नाही.गेली दहा वर्षे शेतकऱ्यांना मोदी सरकारने फसविले आहे.पण यापुढे त्यांच्या कोणत्याच अमिषाला अन् धमकीला भीक न घालता लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करा, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी मतदारांना केले.

सलगर परिसरतातील शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला अनुदान मिळाले नाही.त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार अन अनुदान मिळवून देणार. दुष्काळी 35 गावच्या पाण्याचा प्रश्न मी सोडवणार म्हणजे सोडवणारच.या भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.त्यामुळे मी खासदार झाल्यानंतर रस्ते दुरुस्त करणार म्हणजे करणारच.शेतीसाठी वीज लोडशेडिंग मुक्त करणार म्हणजे करणारच,बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणार म्हणजे देणारच,शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार म्हणजे करणारच अशी प्रतिज्ञा मी केली आहे.असे मत प्रणिती शिंदे यांनी मांडले.

यावेळेस उबाठा शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत,काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष नंदकुमार पवार,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे राहुल शहा,चंद्रशेखर कोंडुभैरी,आप्पा माने,श्रीकांत एळदरे,बसवराज धायगोंडे,अंकुश कांबळे,संग्राम माने आदी नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT