Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sakal
लोकसभा २०२४

Devendra Fadnavis: विधानसभा जिंकण्याची व्यूहरचना तयार : फडणवीस ;जनाधार कायम,समन्वयाचा अभाव आणि खोट्या ‘नरेटिव्ह’मुळे पराभव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘नरेटिव्ह’च्या लढाईत आपली माघार झाली. पण १३० विधानसभा मतदारसंघांत महायुतीला आघाडी आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘‘विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना तयार आहे. आज जे पेरू ते उद्या उगवेल’’, असा विश्वास व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षण नाकारणाऱ्यांनाच या समाजाने काही ठिकाणी मते दिली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली अन् उद्धव ठाकरेंना सहानुभूती कसली होती, असा सवाल करत, ‘‘ते कोकण आणि मुंबईत हरले आहेत’’, असेही फडणवीस म्हणाले.

‘‘नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत, एखादा नेता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होत आहे, असे ६० वर्षांनी घडले आहे, याचा आपल्याला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या यशात महाराष्ट्राचा वाटा कमी असल्याची उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले...

  • या निवडणुकीत तीन पक्ष तर होतेच, पण चौथा पक्षह होता, त्याचा प्रतिवाद करण्यात कमी पडलो

  • भाजपला बहुमत मिळाल्यास राज्यघटना बदलली जाईल हा अपप्रचार केला गेला

  • पक्ष फोडाफोडी, मराठा आरक्षण, राज्यातील गुंतवणूक याबाबत खोटा नरेटिव्ह तयार केला गेला

  • उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती असल्याचे सांगितले गेले. पण ठाणे, कल्याणपासून कोकणापर्यंत एकही जागा त्यांच्या पक्षाला मिळाली नाही

  • महायुतीतील प्रवक्त्यांनी विचारपूर्वक मते मांडावीत

निराशेतून वक्तव्य नाही

राजीनामा देण्याबाबतच्या वक्तव्यावरून बोलताना फडणवीस म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्रिपद सोडतो व पक्षाला पूर्ण वेळ देतो, हे मी निराशेतून किंवा भावनेच्या भरात बोललो नाही. माझ्या डोक्यात आराखडा पक्का आहे. देवेंद्र फडणवीस पळणारा नाही, लढणारा आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumabi Traffic Ambani Wedding : मुंबईत अंबानींचा हायप्रोफाईल लग्नसोहळा, वाहतुकीत महत्वाचे बदल; 'या' मार्गावर जाणं टाळा

T20 World Cup: 'तोही रडत होता अन् मीही, तेव्हा...', रोहितबरोबरच्या 'त्या' खास क्षणाबद्दल विराट झाला व्यक्त

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT