aap cm arvind kejriwal got bail criticise modi govt politics Sakal
लोकसभा २०२४

Arvind Kejriwal: प्रचार सभेतील केजरीवालांच्या विधानावर ईडीचा आक्षेप! सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? वाचा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीच्या अबकारी कर धोरणातील कथित घोटाळा प्रकरणी मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल हे ईडीच्या अटकेनंतर सध्या तिहार तुरुंगातून हंगामी जामिनावर बाहेर आले आहेत. पण बाहेर आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते मतदारांना आवाहन करताना सातत्यानं एक विधान करत आहेत. या विधानावर ईडीनं आक्षेप घेतला असून थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण कोर्टानं याप्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला. (Supreme Court junks ED plea on Arvind Kejriwal speech Wont go into that)

ईडीनं केजरीवालांच्या भाषणावर का घेतला आक्षेप?

केजरीवाल सध्या दिल्लीतील आपल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. पण या प्रचार सभांदरम्यान ते सातत्यानं सांगत आहेत की, "जर २५ मे रोजी तुम्ही कमळाचं बटन दाबलं तर मला पुन्हा तुरुंगात जावं लागेल. पण जर जनतेनं इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मत दिलं तर मला २ जून रोजी पुन्हा तुरुंगात जावं लागणार नाही" त्यांच्या या विधानावरच ईडीनं आक्षेप घेतला आहे. कारण सुप्रीम कोर्टानं जेव्हा केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता तेव्हा त्यांना अट घातली होती की, ते लोकांमध्ये अबकारी कर घोटाळ्यावर बोलणार नाहीत.

ईडीच्या वकिलांनी काय सांगितलं?

ईडीच्यावतीनं सॉलिसिटर जनरल यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना म्हटलं की, केजरीवाल यांचं हे विधान म्हणजे व्यवस्थेला लगावलेली चपराक आहे. केजरीवाल हे स्वतः ला विशेष व्यक्ती समजत आहेत. पण आम्ही तर त्यांचं प्रकरण सामान्य व्यक्तीप्रमाणं पाहत आहोत. कृपया हे लक्षात घ्यावं की सुटकेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काय म्हटलं होतं? अबकारी घोटाळ्यावर हे भाष्य नाही का? यावर न्या. खन्ना म्हणाले, "नाही...त्यांनी या खटल्याबाबत काहीही म्हटलेलं नाही. ही त्यांचं मत आहेत आणि आम्ही याबाबत काहीही बोलू इच्छित नाही. आम्ही आधीच सांगितलं आहे की आमचा आदेश स्वच्छ होता आणि आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत की, आम्ही कोणाहीसाठी कुठलाही अपवादात्मक आदेश दिलेला नाही"

कोर्टानं काय दिला होता निकाल?

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं १० मे रोजी या प्रकरणी झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. कोर्टानं त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी हा जामीन दिला आहे. त्यानंतर त्यांना २ जून रोजी पुन्हा सरेंडर करण्यास सांगितलं आहे. २१ मार्च रोजी केजरीवाल यांना ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून सुमारे दीड महिन्यांहून अधिक काळ त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT