supriya sule win at baramati lok sabha election 2024 sunetra pawar lose  Sakal
लोकसभा २०२४

साहेबच ‘दादा’...!

निवडणुकीअगोदर मांडलेली अनेक गणिते चुकीची ठरवत, आमदार, पदाधिकारी जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने असले

मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा विजय प्राप्त करत बाजी मारली. अत्यंत चुरशीची निवडणूक होईल, असा अंदाज वर्तविला गेला होता.

मात्र अपवाद वगळता बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर व खडकवासला या सहाही विधानसभा मतदारसंघांत सुप्रिया सुळे यांनी पहिल्यापासूनच घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा करिष्मा आणि सुप्रिया सुळे यांची मेहनत याला जनतेने कौल दिला आहे.

निवडणुकीअगोदर मांडलेली अनेक गणिते चुकीची ठरवत, आमदार, पदाधिकारी जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने असले, तरी मतदारांनी मात्र सुप्रिया सुळे यांच्याच पारड्यात मते टाकून आपला विश्वास व्यक्त केल्याचे दिसते.

अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविले तेव्हापासूनच या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. पवार कुटुंबातच लढत होत असल्याने ‘बारामतीवर वर्चस्व कोणाचे?’ हा प्रश्न उपस्थित झाला होता.

अजित पवार आणि भाजपची टीका भोवली

संपूर्ण प्रचारादरम्यान अजित पवार यांचा टीकेचा रोख शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवरही राहिला. विकासासाठी भाजपसोबत गेलो, असे सांगत त्यांनी पवार आणि सुळे यांच्यावर टीकेचा सूर कायम ठेवला.

मात्र जनतेला ना त्यांचा हा प्रचार रुचला, ना त्यांचे भाजपसोबत सत्तेत सहभागी होणे. याशिवाय भाजप नेत्यांनी केलेली शरद पवारांच्या पराभवाची भाषा, नरेंद्र मोदी यांनी थेट उल्लेख न करता ‘भटकती आत्मा’ म्हणणे बारामतीच्या मतदारांना रुचले नाही.

...म्हणून मतदार सुळेंसोबत

पक्षात उभी फूट पडल्यानंतर सुळे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पुढे प्रचारात आघाडी घेत संसदेतील आपल्या कामगिरीची मांडणी सुळे यांनी अहवालातून केली. मतदारसंघात शेवटच्या गावापर्यंत थेट भेट दौरा, संपर्क, संसदेतील भाषणे, भाषेवरील प्रभुत्व, अजित पवार आणि इतरांवर टाळलेली टीका या सर्वांमुळे मतदार सुळे यांच्यासोबत राहिले, हेच या निकालाने दाखवून दिले.

पक्षफुटीनंतर नेते, पदाधिकारी सर्व अजित पवार यांच्या बाजूला असे चित्र होते. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते दोघेही अजित पवार यांच्यासोबत राहूनही हे दिग्गज नेते सुनेत्रा पवार यांना आपापल्या मतदारसंघात मताधिक्य देऊ शकले नाहीत.

मतदारांनीच निवडणूक घेतली हातात

अजित पवारांनी ज्या पदाधिकाऱ्यांच्या जिवावर विजयाची आकडेवारी मांडली होती, मात्र तेच कुचकामी असल्याचे या निकालाने दाखवून दिले. त्यामुळे मतदारांवर नेत्यांचा किती प्रभाव आहे, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेनेसह अनेक घटक पक्ष अजित पवार यांच्या मदतीला धावून आलेले असले तरी प्रत्यक्षात निवडणूक मतदारांनीच हाती घेतल्याने अजित पवार यांचा प्रभाव कुठेही न दिसता एकतर्फी निवडणूक सुळे यांच्या बाजूने फिरलेली दिसली.

अजित पवारांच्या निर्णयाला विरोध

या निवडणुकीत अजित पवार यांचे कुटुंबीय वगळता कुटुंबातील इतर सदस्यांनी सुप्रिया सुळे यांना साथ देण्याचा निर्णय घेत त्यांचा जाहीर प्रचार केला. त्याविरोधात स्वतः अजित पवार यांनी प्रचाराचा झंझावात केला होता.

खडकवासला मतदारसंघातही त्यांनी सोसायट्यांमध्ये जाऊन प्रचार केला होता. मात्र त्याला फारसे यश आलेले निकालातून दिसत नाही. काही विधानसभा मतदारसंघांत सुप्रिया सुळे, तर काहींमध्ये सुनेत्रा पवार आघाडी घेतील, अशी जाणकारांची शक्यताही मोडीत निघाली. खडकवासला विधानसभा मतदारसंघ वगळता सुप्रिया सुळे यांनाच मतदारांनी पसंती दिली आहे.

बारामती लोकसभा

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) - ७,३२,३१२ मिळालेली मते

सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) - ५,७३,९७९ मिळालेली मते

  • बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदरमध्ये तुतारीची ललकारी

  • खडकवासल्यातील मतदारांची सुनेत्रा पवारांना ‘गॅरंटी’

  • सातव्या फेरीने वहिनींसाठी केल्या ‘आशा’ पल्लवित

  • बहुतांश फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळेंनाच मताधिक्‍य

  • खडकवासल्यात ‘अखेर’च्या फेरीत दीड हजार मते

  • दौंड, इंदापूर, पुरंदरवासीयांनी नेत्यांनाच दाखविला आरसा

  • युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीने वाढविले कार्यकर्त्यांचे बळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT