dhairyasheel mane satyajit patil sarudkar esakal
लोकसभा २०२४

ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेत राडा, सत्यजित पाटील आणि धैर्यशील माने यांच्या समर्थकांच्यात जोरदार हाणामारी ! नेमकं काय घडलं?

पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरुन बाजुला केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे मतदान असलेल्या साखराळे (ता. वाळवा) येथे आज दोन गटात जोरदार हाणामारी झाली. मतदानाच्या ठिकाणी बोगस प्रतिनिधी असल्याच्या संशयावरून जाब विचारल्याने सत्यजित पाटील आणि धैर्यशील माने समर्थकांच्यात जोरदार हाणामारी झाली. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. साखराळे गावातील बूथ क्रमाक ५८ ते ६३ क्रमांकाच्या बौद्ध विहार परीसरातील बूथवर हा प्रकार घडला.

या केंद्रांवर सत्यजित पाटील यांचे बोगस प्रतिनिधी होते आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी काही काळ मतदान केंद्राचे कामकाज बंद पाडले होते. यावरून सत्यजित पाटील - सरूडकर याचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात शाब्दिक चकमक, शिवीगाळ व वादावादी होऊन हाणामारी झाली.

(Hatkanangale Lok Sabha Election)

त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत भांडण थांबवले. त्यानंतर मात्र घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यानंतर चे दुपारपर्यंत मतदान मात्र शांततेत झाले. धैर्यशील माने गटाचे दत्तात्रय पाटील यांनी सत्यजित पाटील यांच्या बोगस प्रतिनिधीवर कारवाई करावी व गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. साळुंखे नावाच्या अपक्ष उमेदवाराच्या नावाने बोगस सह्या करून हे प्रतिनिधी आत व बाहेर थांबले होते, अशी तक्रार श्री. पाटील यांनी केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३६.१७ टक्के मतदान झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT