Thane loksabha Election Result
Thane loksabha Election Result  sakal
लोकसभा २०२४

Thane loksabha Election Result : मुख्यमंत्र्यांनी गड राखला

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा गड राखण्यात यश आले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे) उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरेचे राजन विचारे यांचा पराभव केला. सुमारे दोन लाख मतांनी नरेश म्हस्के विजयी झाले.

दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघातही शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या (ठाकरे) वैशाली दरेकर यांचा पराभव केला. या दोन्ही जागा शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात होत्या. जिल्ह्यात महायुतीच्या खात्यात दोन जागा आल्या असल्या, तरी भिवंडीत भाजपचे कमळ कोमेजले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी पराभव केला असून, ते जायंट किलर ठरले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यापैकी ठाणे व कल्याण मतदारसंघामध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने होते. भिवंडीत भाजपविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) अशी लढत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, भाजप मतांची शिदोरी या जोरावर महायुतीच्या शिवसेनेच्या शिलेदारांचा विजय पक्का झाला. भिवंडीत जातीय समीकरणावर निवडणूक लढविण्यात आली. म्हणूनच खुद्द नरेंद्र मोदी यांची प्रचंड मोठी सभा होऊनही भाजपला आपला गड गमवावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'डक'वर आऊट होणाऱ्या पंतची लज्जास्पद कामगिरी! टी20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात नोंद झाली विकेट

Ind vs Sa T20 WC Final Live Score : अक्षरचा आत्मघात; धावबाद झाल्यानं हुकलं झुंजार अर्धशतक

Neerja Chaudhary : 'लोकसभा निवडणुकीद्वारे 10 वर्षांच्या निरंकुश सत्तेला लगाम'; असं का म्हणाल्या लेखिका नीरजा चौधरी?

IND vs SA Final: द. आफ्रिकेच्या महाराजचा भारताला दे धक्का! एकाच षटकात रोहित-पंतला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा Video

Akola ACB : बार NOC साठी सव्वा लाखाची डिमांड; पोलिस पाटील ACB च्या जाळ्यात, ग्रामसेविका फरार

SCROLL FOR NEXT