Shiv Sena  sakal
लोकसभा २०२४

Shiv Sena :चिन्ह बदलाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार का ? पक्षाला ‘मशाल’ सर्वांपर्यंत पोचविण्याचे आव्हान

राज्यातील दोन मोठे पक्ष फुटून सत्तेत सामील झाले, त्यानंतरच्या कायदेशीर लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्ह घड्याळ हे अजित पवार यांना यांना मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

पांडुरंग म्हस्के : सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यातील दोन मोठे पक्ष फुटून सत्तेत सामील झाले, त्यानंतरच्या कायदेशीर लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्ह घड्याळ हे अजित पवार यांना यांना मिळाले. अशीच परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत झाली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचे धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेऊन त्यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले.

गेली अनेक वर्षे धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेने निवडणूक लढवली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेल्या नेत्यांनीही याच चिन्हावर विविध निवडणुका लढविल्या आहेत. त्यांना आता नव्याने मिळविलेल्या मशाल या चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत. सध्याच्या माहितीच्या युगात समाज माध्यमे अत्यंत ताकदवान असताना मशाल चिन्ह गावोगावी पोचविणे फारसे अवघड नसले, तरी चिन्ह बदलाचा फटका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईत तीन ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी लढत होत आहे. त्यामुळे या जागांवर किमान १० ते १५ टक्के मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईत शिवसेना (शिंदे गट) उमेदवार यामिनी जाधव आणि शिवसेना (ठाकरे गट) समोरासमोर आहेत. जाधव यांनी यापूर्वी धनुष्यबाणावर भायखळा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून जिंकली आहे.

तर दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांनी मागील लोकसभा निवडणूक धनुष्यबाण या निशाणीवर लढवून जिंकली आहे. त्यांच्या समोर शिवसेनेचे (ठाकरे गट) अनिल देसाई निवडणूक लढवीत आहेत. त्याचबरोबर वायव्य लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) अमोल कीर्तिकर आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे रवींद्र वायकर यांच्यात लढत होत आहे. वायकर यांनाही याच लोकसभा मतदार संघातील जोगेश्वरी मतदार संघातून विधानसभा निवडणूक धनुष्यबाण निशाणीवर लढवली आहे.

शिवसनेच्या (शिंदे गट) उमेदवारांनी त्यांच्या मागील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली असल्याने, त्यांनी धनुष्यबाण मतदारसंघात पोचविले आहे. त्यामुळे आजही मतदारांमध्ये धनुष्यबाण म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा संभ्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रवींद्र वायकर तर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. त्यामुळे त्यांच्याबाबतीत मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

उमेदवार कोण याची चर्चा

अनेकदा उमेदवारांच्या प्रचार सभा मतदारसंघात निघत असताना, सर्वसामान्य मतदार निशाणी बघूनसुद्धा उमेदवार कोण आणि कोणत्या गटाचा याबाबत विचारणा करताना दिसत आहे. अनेक जुन्या शिवसैनिकांनी आतापर्यंत धनुष्यबाण या निशाणीवरच शिक्का मारलेला आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या वेळी सवयीने त्यांचा हात धनुष्यबाण निशाणीकडे जाण्याची शक्यता जुने शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. अनेक मतदार अशिक्षित आहेत, त्यांच्यापर्यंत योग्यपद्धतीने पोहोचणे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षापुढे आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT