Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : मोदी-राहुल यांच्या सभांचा धडाका शांत ; ‘तोंड उघडले तर हिशेब निघेल’

सकाळ वृत्तसेवा

होशियारपूर (पंजाब) : ‘‘सध्या मी गप्प बसलो आहे, ज्या दिवशी तोंड उघडेन, तेव्हा तुमच्या सात पिढ्यांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडेन,’’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज होशियारपूर येथील सभेतून दिला. ‘इंडिया’ आघाडीचे लोक मला नवनवीन दूषणे देतात. पण काँग्रेसने भ्रष्टाचारात दुहेरी पीएचडी मिळवली आहे. आता तर आम आदमी पक्षही त्यात सामील झाला आहे, अशीही टीका त्यांनी केली.

पंजाबमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मेादी यांनी होशियारपूरच्या रामलीला मैदानात सभा घेतली. होशियारपूरच्या भाजपच्या उमेदवार अनिता सोमप्रकाश आणि आनंदपूर साहिबचे उमेदवार सुभाष शर्मा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदी बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘माझ्या गप्प बसण्यामागे कमकुवतपणा समजू नका. ज्यादिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी तुमच्या सात पिढ्यांचा हिशोब बाहेर काढला जाईल. ‘इंडिया’ आघाडीचे लोक जवानांचा सतत अपमान करतात. त्यांनी दिवंगत जनरल बिपिन रावत यांना गल्लीतला गुंड म्हणून म्हटले होते. हा लष्कराचा अवमान होता. काँग्रेसच्या राजवटीत लष्कराला कमकुवत करण्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती. मला काहीही बोला, परंतु देशाच्या लष्कराचा अपमान सहन करणार नाही.’’ आदमपूर विमानतळाला गुरू रविदास यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.

गरिबांचे कल्याण करणे मोदी सरकारचे प्राधान्य राहिले आहे आणि यात गुरू रविदास यांची प्रेरणा आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आमच्या सरकारने एक क्षणही वाया घालवला नाही. सरकार स्थापन होताच पुढील १२५ दिवसांत काय करणार, याचा आराखडा तयार केला आहे. यातही २५ दिवस तरुणांवर भर दिला जाणार आहे. पुढील पाच वर्षांत कोणते मोठे निर्णय घ्यायचे आहेत, याचीही तयारी केली आहे, असे मोदी म्हणाले.

काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या स्वार्थी आणि मतांच्या राजकारणाने देशाचे खूप नुकसान झाले आहे. मतपेढीवर असणाऱ्या प्रेमामुळे देशाच्या फाळणीच्या वेळी कर्तारपूर साहिबवर आपला हक्क दाखवता आला नाही, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT