Hatkanangale Lok Sabha Sadabhau Khot esakal
लोकसभा २०२४

Sadabhau Khot : 'मंत्रिपद गेलं, गाडीवालं पन गेलं, गाड्या बी गेल्या, आता मला च्याबी प्याला कोण बोलवत नाही'

मला वाटायचं माझ वजन लय वाढलंय. पण मंत्रिपद गेलं तसं गाडीबी गेली आणि गाडीवानबी गेला.

सकाळ डिजिटल टीम

'मंत्रिपदाच्या काळात मला रात्री एक-एक वाजेपर्यंत फोन यायचे, आता मी त्यांना फोन केला तरी ते उचलत नाहीत.. हे खूप वाईट आहे.'

हातकणंगले : ‘सत्ता लयं वाईट आहे, मी भोगलीयं; पण मंत्रिपद गेलं त्याच्याबरोबरच गाडीवालं पन गेलं, गाड्या बी गेल्या आणि मी एकटाच राहिलो. मंत्री असताना प्रत्येकाला जेवू घातलं, पण आज मला च्याबी प्याला कोण बोलवत नाही,’ अशा शब्दांत माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खोत यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या मतदारसंघातून महायुतीकडून ते स्वतः लढण्यास इच्छुक होते; पण त्यांच्याऐवजी माने यांना उमेदवारी मिळाली आणि खोत त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले.

मिश्‍कली टोमणे, ग्रामीण बाज जपत केलेली शब्दांची फेक यामुळे खोत यांची भाषणे नेहमीच खुमासदार होतात. आजही या त्यांच्या शैलीची प्रचिती आली. ‘माझी गाडी आली की प्रत्येक तालुक्यात मागून दहा-बारा गाड्या लागायच्या, गर्दी उडायची, दोन-दोन किलोमीटर रांगा लागायच्या. मला वाटायचं माझ वजन लय वाढलंय. पण मंत्रिपद गेलं तसं गाडीबी गेली आणि गाडीवानबी गेला. मी मात्र एकटाच राहिलो. मंत्रिपदाच्या काळात मला रात्री एक-एक वाजेपर्यंत फोन यायचे, आता मी त्यांना फोन केला तरी ते उचलत नाहीत.. हे खूप वाईट आहे’, असे ते म्हणाले.

‘दुसरं सरकार आलं, मी गाडी घेऊन गावाकडं आलो. नेहमीप्रमाणे खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो. रस्त्यावरून येणाऱ्या गाडीचा उजेड तोंडावर पडला की मला वाटायचं माझ्याकडंच कोणतर यायला लागल्याती. पण एकानंसुद्धा काच खाली करून विचारलं नाही, हे लयं वाईट असतयं, सत्ता असली की सगळे मागे पळतात; पण आता कोण नाही’, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

‘मंत्री असताना सर्वांना सांभाळायचो, त्यावेळी लोकं म्हणायची, लय मंत्री बघितलं, पण तुमच्यासारखा माणूस बघितला नाही. मग आता मंत्रिपद गेल्यावर तो चांगला माणूस कुठं गेला?’ असा सवाल करून खोत म्हणाले,‘मंत्री झाल्यावर लोकं घरी आले की त्यांना लसणाची चटणी, दही, ठेचा आणि भाकर खाऊ घालायचो. सत्ता गेली आणि कोणी कामाला राहू दे, साधा च्याबी प्यायला बोलवत नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT