Hatkanangale Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Hatkanangale Lok Sabha : मतदार यादीतील नावं गहाळ! मतदान न करता आल्याने 'या' गावातील लोक न्यायालयात करणार याचिका दाखल

तिसऱ्या‍ टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान ७ मे रोजी पार पडले.

सकाळ डिजिटल टीम

इचलकरंजी विधानसभा (Ichalkaranji Assembly) मतदारसंघामधील नावे गहाळ झालेल्या मतदारांना एकत्रित आणून न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.

इचलकरंजी : लोकसभा निवडणुकीवेळी (Hatkanangale Lok Sabha) कोरोची (Korochi Village) येथील ५० हून अधिक नागरिकांना मतदार यादीमधील नावे गहाळ केल्यामुळे मतदानाच्या मूलभूत हक्कास मुकावे लागले होते. यावेळी नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यां‍नी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दुसऱ्या‍च दिवशी तुम्हाला मतदान करता येत नसल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, इचलकरंजी विधानसभा (Ichalkaranji Assembly) मतदारसंघामधील नावे गहाळ झालेल्या मतदारांना एकत्रित आणून न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. त्यासंदर्भात वकिलांशी चर्चा झाली असून, लवकरच याचिका दाखल करणार असल्याचे युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी सांगितले.

तिसऱ्या‍ टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान ७ मे रोजी पार पडले. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील कुमार विद्यामंदिर या मतदान केंद्रावर मतदान असलेल्या सुमारे ५० हून अधिक नागरिकांची नावे मतदार यादीमधून गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या नागरिकांना मतदानाचा हक्क बाजवता आला नाही. यावेळी संतापलेल्या नागरिकांनी केंद्रावरच ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करला होता.

केंद्रावर वातावरण तणावपूर्ण होत असल्याने उपस्थित पोलिस अधिकाऱ्यां‍नी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर नागरिकांनी संबधित अधिकाऱ्यां‍शी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्यांना मतदान करता आले नाही, अशा नागरिकांचा शोध युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने घेण्यात येत आहे. त्यांना एकत्रित करून न्यायालयात याचिका दाखल करण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT