Maratha Reservation Manoj Jarange-Patil esakal
लोकसभा २०२४

'निवडणुकीत मराठ्यांनी पाडणाऱ्याला इतक्या ताकदीनं पाडा की, पाडणाऱ्याच्या चार-पाच पिढीत कुणीच उभं राहिलं नसलं पाहिजे'

कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला पाडायचे, याचा निर्णय समाजाने घ्यावा.

सकाळ डिजिटल टीम

''लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी उमेदवार उभे केले असते. मात्र, अचानक उमेदवार उभे करून समाज मातीत घालायचा नव्हता.''

इचलकरंजी : ‘लोकसभा निवडणुकीत मराठा समाजासमोर (Maratha Community) कोणताच पर्याय दिला नाही. मात्र, निवडणूक समाजाच्या खांद्यावर आहे. मराठ्यांच्या एकीची भीती वाटत होती; तर आता मतांचीही भीती वाटत आहे. कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला पाडायचे, याचा निर्णय समाजाने घ्यावा. मात्र पाडणाऱ्याला इतक्या ताकदीने पाडा की पाडणाऱ्याच्या चार-पाच पिढीत कुणीच उभे राहिले नसले पाहिजे. उभे राहण्यापेक्षा पाडण्यात मोठा विजय आहे, हेच यावेळी मराठा समाज करेल’, असा इशारा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जरांगे-पाटील म्हणाले, ‘येत्या काळात देशात विखुरलेल्या सुमारे १३ कोटी मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी देशाचा दौरा करणार आहे. छत्रपतींच्या गादीचा सन्मान केला पाहिजे. मात्र, मराठा आरक्षणात (Maratha Reservation) अडथळे आणणारे, विरोध करणारे कोण, हे स्थानिक पातळीवरच माहीत असते. त्याचा विचार करून मतदान करा.’ यावेळी संतोष सावंत, शहाजी भोसले, मोहन मालवणकर, अरविंद माने आदी उपस्थित होते.

‘लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी उमेदवार उभे केले असते. मात्र, अचानक उमेदवार उभे करून समाज मातीत घालायचा नव्हता. मराठा समाज आता संघटित झाला असून, या समाजाची ताकद सरकारलाही कळाली आहे. येत्या काळात मराठ्यांचा नवीन दणका असणार आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करून मराठा व कुणबी एकत्र कायदा पारित केला नाही, तर विधानसभेला मराठा मैदानात असणार आहे’, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT