Hatkanangale Lok sabha Raju Shetti esakal
लोकसभा २०२४

Hatkanangale Loksabha : 'मतदार माझ्या पाठीशी, मी लढणारच'; राजू शेट्टी आपल्या भूमिकेवर ठाम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्याच्या राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या आरोपाचे शेट्टी यांनी खंडन केले.

सकाळ डिजिटल टीम

'महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी मी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी दोनवेळा चर्चा केली. त्यावरून ते उमेदवार देण्याच्या मानसिकतेत नाहीत, असे संकेत मला मिळाले.'

कोल्हापूर : ‘महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या (Mahayuti) जागा वाटपाचे काय झाले, याची चौकशी करणे हे माझे काम नाही. माझे काम चालू आहे. मतदारसंघातील पहिला भेटीगाठींचा टप्पा पूर्ण झालेला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उमेदवार उभा केला, तर तिरंगी लढत होईल. नाही केला, तर दुरंगी लढत होईल. मात्र, असे झाले तरी मी लढणारच आहे, मतदार माझ्या मागे उभा आहे’, असा विश्‍वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

शेट्टी म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी मी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी दोनवेळा चर्चा केली. त्यावरून ते उमेदवार देण्याच्या मानसिकतेत नाहीत, असे संकेत मला मिळाले. शेवटी पक्ष म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. उमेदवारी दिली तर काय होईल, नाही दिली तर काय होईल, या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.

सध्या मी माझे काम करीत आहे. एकीकडे गोवंश हत्याबंदी कायदा केला; मात्र मॉब लिचिंगद्वारे गोरगरिबांना ठेचून मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली. दुसरीकडे ‘बीफ’ निर्यात करून पैसा कमवायचा आणि ‘बीफ’ निर्यात करणाऱ्यांकडून इलेक्ट्रॉल बॉण्ड मिळवायचे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रवाद आणि वैचारिक भूमिका संशयास्पद आहेत.’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्याच्या राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या आरोपाचे शेट्टी यांनी खंडन केले. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्यातील काहीजण अजित पवारांसोबत गेले. मागे अवशेष ठेवले. भाजपचे हस्तक म्हणून ते काम करत आहेत. याच्यावर शरद पवारच जास्त प्रकाश टाकू शकतील. रविकांत तुपकर अजून स्वाभिमानीतच आहेत. त्यांनी स्वाभिमानीमार्फत निवडणूक लढवावी, असा आमचा आग्रह आहे.’

वाढ झालेली संपत्ती दान करण्याची तयारी

‘माझी संपत्ती वाढली की कमी झाली, याची माहिती ३१ मार्चला सर्वांसमोर येईल. पाच वर्षांपूर्वी माझ्यावर किती कर्ज होते आणि किती संपत्ती होती. आता किती कर्ज आहे, हे सर्व जनतेसमोर येईल. माझ्या संपत्तीत वाढ झाली असेल, तर जेवढी वाढ झालेली आहे, ती दान करण्याची तयारी असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT