निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरीही या मतदार संघाचा महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याबाबत अजून संभ्रम आहे.
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : लोकसभेच्या जागा वाटपात महायुतीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जागेवरून शिवसेनेची (Shiv Sena) पकड आता ढिली झाली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नाव नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा मतदारसंघ भाजपच्या (BJP) वाट्याला जाणार, अशीच अटकळ बांधली जात आहे.
दिल्लीत जाऊन केंदीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री बैठक घेऊनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासह काही अन्य जागांचा तिढा सुटलेला नव्हता. सोमवार (ता. २५) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याचे पुढे आले आहे. शिंदे गटाच्या यादीत या मतदारसंघाचे नाव नसल्याची चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने आणि शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरीही या मतदार संघाचा महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याबाबत अजून संभ्रम आहे. रात्री मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली तरीसुद्धा तिढा कायम आहे. येत्या २ दिवसांत महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर केले जातील, असे युतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.
ठाणे हा शिंदे शिवसेनेचा गड आहे. कल्याणला शिंदे यांचा मुलगा खासदार तर पालघरला शिंदे गटांचा खासदार, रायगडला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हासुद्धा जर शिंदे गटाला सोडला गेला तर भाजपला काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
युती म्हणून समन्वय हवा, अशी मागणी भाजपकडून केली गेली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा भाजपलाच मिळायला हवा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांपुढे मांडल्या होत्या. याचा परिपाक म्हणून हा मतदार संघ भाजपला देण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेकडून या मतदार संघावर दावा केला गेला होता. ही जागा मिळणार या विश्वासाने शिवसेनेने कामाला प्रारंभही केला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांचे नाव पुढे होते. त्यांनी गट आणि गणनिहाय बैठकाही घेतल्या. अनेक विकासकामांमध्ये ते हिरीरिने भाग घेत होते. शिंदे गटाच्या यादीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे नावच नसल्याची चर्चा असल्यामुळे ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आरंभीचा जोष, उत्साह मावळू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेलाच तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार आणि बाळ माने यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. त्यामध्ये राणेंचे नाव आघाडीवर आहे. याबाबत काल सायंकाळी उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.