Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

बस झालं, आमचे जेवढे तुम्ही, तेवढेच तुमचे आम्ही..! सामंत समर्थकांकडून इशारा; व्हायरल पोस्टने खळबळ

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) जागेचा महायुतीचा तिढा काही सुटण्याचे नाव घेईना.

सकाळ डिजिटल टीम

कमळ चिन्हावरच ही जागा लढली गेली पाहिजे, असा भाजपचा आग्रह आहे. परंतु सामंत धनुष्यबाणावरच निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत.

रत्नागिरी : बस झालं आता... मंदिरातील प्रसाद नाही आम्ही, सगळ्यांमध्ये सारखा वाटून जायला. आमचे जेवढे तुम्ही, तेवढेच तुमचे आम्ही. ना कम, ना जादा... रामकृष्ण हरी... अशी सोशल मीडियावर किरण सामंत (Kiran Samant) समर्थकांकडून व्हायरल झालेली पोस्ट हा इशारा समजायची का? अशी चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील (Mahayuti) संबंध अधिक ताणल्याची ही चिन्हे आहेत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

परंतु, उमेदवार कोण हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) जागेचा महायुतीचा तिढा काही सुटण्याचे नाव घेईना. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाने हा विषय प्रतिष्ठेचा करून ताणून धरला आहे. मात्र, यामध्ये कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा आहे, हे आता दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविण्याची गरज आहे. एकदा भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा पुढे येते. तर काही वेळातच शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांचे नाव पुढे येते.

परंतु महायुती म्हणून गेली आठ दिवस या विषयाची फक्त चर्चाच सुरू आहे. त्याची अधिकृत घोषणा होण्याची उत्सुकता पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांमध्ये आहे. कोकणपट्ट्यात भाजपला एकही जागा नसल्यामुळे पक्ष वाढीसाठी हे हानिकारक आहे. त्यामुळे भाजप ठाम आहे; तर ही पारंपरिक जागा असल्याने शिवसेनाही या जागेवर ठाम आहे.

यावर तोडगा निघावा यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर आता किरण सामंत देखील मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. परंतु कधी पारडे राणेंकडे झुकते, तर कधी सामंतांकडे; परंतु निर्णय काही होत नाही. या साऱ्या पार्श्र्वभूमीवर, आमचे जेवढे तुम्ही, तेवढेच तुमचे आम्ही. ना कम, ना जादा... अशी पोस्‍ट किरण सामंत यांच्या समर्थकांनी फेसबुकवर व्हायरल केली आहे. याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सहनशीलतेचा अंत

कमळ चिन्हावरच ही जागा लढली गेली पाहिजे, असा भाजपचा आग्रह आहे. परंतु सामंत धनुष्यबाणावरच निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने आता शिवसेना पदाधिकाऱ्यांची सहनशीलता संपल्याचे बोलले जाते. भाजपने ज्या पद्धतीने हा विषय ताणून धरला आहे, त्यावरून मित्रपक्षाने हा इशारा दिला आहे असा तर्क लढवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT