लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे तिरंगी लढतीचा कोणाला फटका बसेल, हे आता सांगणे कठीण आहे.
कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, अशी आमची प्रामाणिक भूमिका होती. लोकसभेची हातकणंगलेची जागा काँग्रेसला मिळाली असती तर आम्ही त्यांचा विचार केला असता. ही जागा आता शिवसेनेकडे आहे, असं आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्पष्ट केलं.
हातकणंगलेच्या (Hatkanangale Lok Sabha) जागेबाबत खासदार संजय राऊत आणि शेट्टी यांची चर्चाही झाली होती. मात्र, साखरपुडा झाला. पण, लग्न जमलं नाही, अशी स्थिती झाली असल्याचे मिश्कील उत्तरही आमदार पाटील यांनी दिले.
कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे तिरंगी लढतीचा कोणाला फटका बसेल, हे आता सांगणे कठीण आहे. मात्र, आम्ही महाविकास आघाडी म्हणून हातकणंगलेत जोमाने काम करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.