क्षीरसागर यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ते प्रचारात नव्हते; परंतु काल उत्तरकार्य झाल्यानंतर त्यांनी आज प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.
कोल्हापूर : ‘कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतील शिवसेना (Shiv Sena) महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणू. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख कामामुळे ‘अब की बार चारसो पार’ हे निकालानंतर स्पष्ट होईल’, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आज येथे व्यक्त केला.
शनिवार पेठ येथील शिवसेना भवन कार्यालयात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उमेदवार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचार नियोजनासाठी ‘मिसळ पे चर्चा’ बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘यावेळी आणखी मताधिक्य वाढेल असा विश्वास आहे. भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. क्षीरसागर यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ते प्रचारात नव्हते; परंतु काल उत्तरकार्य झाल्यानंतर त्यांनी आज प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.’
भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाखो नागरिकांना झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनता मंडलिक यांच्या पाठीशी ठाम उभी राहील.’ यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव, आदिल फरास, सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, नंदकुमार मोरे, अशोक देसाई, आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज : ‘१७ एप्रिल रोजी रामनवमी येत आहे. त्याच दिवशी माझा तिथीनुसार वाढदिवस आहे. दरम्यान, या निवडणुकीत ८५ वर्षांवरील वयोवृद्ध नागरिक व दिव्यांगांना घरातून मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त त्यादिवशी अशा मतदारांच्या घरी जाऊन प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाचा संकल्प त्यांना सांगा’, अशी हाक पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज येथील बैठकीतून कार्यकर्त्यांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.