‘शाहू छत्रपती यांनी नेहमीच समाज घटकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या विजयासाठी आम्ही मागे राहणार नाही.’
कोल्हापूर : ‘सत्तेच्या हव्यासापोटी स्वाभिमान बाजूला ठेवून राज्याला वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. पहाटेच्या शपथविधीला राज्यपालांनी मान्यता कशी दिली, हे समजू शकत नाही. फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र अस्थिर बनला आहे. त्यामुळे राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे. मोठे उद्योग गुजरातला (Gujarat) पळविले जात आहेत. पुन्हा महाराष्ट्र प्रगतशील बनविण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) हाच सक्षम पर्याय आहे.
या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha) मला आणि हातकणंगलेमधून सत्यजित पाटील-सरुडकर यांना निवडून द्या’, अशी साद शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी घातली. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील होते. आमदार पी. एन. पाटील प्रमुख उपस्थित होते.
‘आरपीआय’तर्फे दगडू भास्कर आणि शिरोली दुमाला, बहिरेश्वर, हिरवडे, महे, सावरवाडी, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, मांडरे, आरळेच्या सरपंचांनी महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे यावेळी जाहीर केले. आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. शाहू छत्रपती हे सर्वसामान्य लोकांसाठी धडपडणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला. त्यांच्या पाठीशी जिल्ह्याची ताकद उभी करूया.’
विश्वास पाटील म्हणाले, ‘शाहू छत्रपती यांनी नेहमीच समाज घटकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या विजयासाठी आम्ही मागे राहणार नाही.’ शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, ‘नागरिकांनी बेईमानी करणाऱ्यांना या निवडणुकीत घरी बसवावे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘लोकसभेला शाहू छत्रपती विजयी होतील. विधानसभेला पी. एन. पाटील यांच्या विजयासाठी आम्ही प्रचाराला येऊ.’
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समिती सभापती भारत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजी पाटील, काँग्रेसचे शंकरराव पाटील, सत्यजित पाटील, चेतन पाटील, सरपंच सचिन पाटील उपस्थित होते.
आजरा : ‘लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जनतेने गांभीर्याने पाहावे. लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून हद्दपार करा’, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले. इंडिया आघाडीने तालुक्यात जनसंपर्क यात्रा काढली होती. या वेळी किटवडे येथे झालेल्या मेळाव्यात आपटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. संपत देसाई, मुकुंदराव देसाई, ‘गोकुळ’च्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांची मनोगते झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.