'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न आपल्यासमोर ठेवले आहे. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी शिवरायांच्या राजधानीमधील शिलेदार आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे.'
दाभोळ : देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आपल्याला बहुमतात आणायचे आहे. ‘४०० पार’ ही घोषणा सत्यात उतरविण्यासाठी महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून नव्हे, तर आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आणायचे आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांत प्रथम भाजपने याबद्दल सकारात्मकता दाखवली असल्याचे मत महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दापोली येथे व्यक्त केले.
दापोली शहरातील केळुस्कर नाका येथे भाजपच्या (BJP) बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, महिला जिल्हाध्यक्ष नीलम गोंधळी, स्मिता जावकर आदी उपस्थित होते.
अदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘संपूर्ण रायगड मतदारसंघामध्ये (Raigad Constituency) महायुतीची प्रचंड मोठी ताकद आहे. या ताकदीला जोड देण्यासाठी खासदार म्हणून दूरदृष्टी असलेले नेतृत्व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून पाठवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न आपल्यासमोर ठेवले आहे. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी शिवरायांच्या राजधानीमधील शिलेदार आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे.
संपूर्ण रायगड मतदारसंघ व त्यातही विशेषत्वाने गुहागर व दापोली हे तालुके पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास होऊ शकतो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पर्यटनाचा मोठा निधी या भागामध्ये आणण्याचे खासदार तटकरे यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने पर्यटनावर लक्ष देऊन रोजगारनिर्मिती केली जाणार आहे.’’
महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीका करताना अदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘निवडणुका आल्या की अनंत गीते हे मतदारसंघात फिरतात. पराभवानंतर त्यांनी या मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती. त्यांच्याकडे तीन वेळा मंत्रिपद असूनही एकदाही एकही चांगले विकासात्मक काम केले नाही, अवजड उद्योग मंत्री असताना त्यांनी एकही उद्योग या मतदारसंघात आणलेला नाही.’’
माजी आमदार विनय नातू म्हणाले, ‘‘१९७२ पासून दापोली तालुक्याचा एक तृतीयांश भाग हा गुहागर मतदारसंघात होता व त्या वेळी जनसंघाचा आमदार निवडून आला होता. रत्नागिरीतून पहिला खासदारही जनसंघाचा आला होता. काँग्रेसने मोदींना विरोध करताना पहिल्या वेळी ‘चहावाला’ म्हणून हिणावले, त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत ‘चौकीदार’ म्हणून टीका केली, तर आज मोदी परिवाराला विरोध केला जात आहे. मात्र, जनतेने दरवेळी मोदींना प्रचंड यश दिले. तटकरेंच्या रुपाने आपल्याला मोदींचे हात बळकट करायचे आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.