MLA Prakash Awade esakal
लोकसभा २०२४

Hatkanangle Lok Sabha : आमदार प्रकाश आवाडेंचाही 'हातकणंगले'तून शड्डू; 'या' पक्षाकडून उमेदवारी घोषित, महायुतीचं वाढलं टेन्शन

मी एकदाच ही निवडणूक लढविणार आहे. त्यानंतर लढविणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

मी उमेदवार आहे, हे मला येथे येईपर्यंत माहिती नव्हते. राहुल आवाडेंनी येथे घोषणा केल्यावरच मी उमेदवार असल्याचे समजल्याचा गौप्यस्फोट आमदार आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर : लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातून (Hatkanangle Constituency) ताराराणी पक्षातर्फे (Tararani Party) माझे वडील आमदार प्रकाश आवाडे रिंगणात असतील, अशी माहिती पक्षाचे उपाध्यक्ष राहुल आवाडे (Rahul Awade) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही उमेदवारी असल्याचेही प्रकाश आवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) मंगळवारी (ता. १६) अर्ज दाखल करतील. ते ही लढाई जिंकतील, असा विश्‍वास राहुल आवाडे यांनी व्यक्त केला. राहुल म्हणाले, ‘‘ताराराणी पक्ष २०१७ मध्ये स्थापन झाला आहे. लोकसभेच्या या मतदारसंघातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रकाश आवाडे करत आहेत.’’ यानंतर प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘विधानसभेची जागा जिंकल्यानंतर मी, भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. आजही मी महायुतीतच आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर परिस्थिती वेगळी होती. आताची वेगळी आहे.

मी एकदाच ही निवडणूक लढविणार आहे. त्यानंतर लढविणार नाही. मी निवडणूक लढवणार आहे, जिंकणार आहे. सर्व अंदाज घेऊन माझी उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल आवाडे यांनी लोकसभा लढवावी, अशी माझी इच्छा होती. त्यांना महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी भूमिका होती; मात्र, ‘मला उमेदवारी द्या’, अशी मागणी केलेली नव्हती.

राहुल आवाडेंनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये मी निवडणूक लढविली, तर किमान ६०-७० हजार मतांनी विजयी होईन, असा निष्कर्ष निघाल्यामुळे मी रिंगणात उतरलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आमचे नेते आहेत आणि येथून पुढेही तेच राहतील.’’ यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाशराव दत्तवाडे, प्रकाश मोरे उपस्थित होते.

कोल्हापूरला जमलं नाही ते मी केले!

महायुतीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर तुम्ही रिंगणात का उतरताय? उशीर झाला, असे वाटत नाही काय? यावर आमदार आवाडे म्हणाले, ‘‘रोजगार देण्याचे काम मी केले आहे. मी नवखा नाही. लोकसभेच्या या मतदारसंघातील घरोघरी मी परिचित आहे. त्यामुळे रिंगणात उतरलो आहे. देशात सुरतनंतर इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार आहे. तो देण्याचे काम मी केले आहे. त्याचा अभिमान आहे. रोजगार देण्याचे काम मी करणार आहे. इचलकरंजीला उद्योग क्षेत्रात ‘हायटेक सिटी’ केले आहे; ते कोल्हापूर शहराला अजून जमले नाही. हीच भूमिका घेऊन मी मतदारांसमोर जाणार आहे.’’

मी, उमेदवार हे पत्रकार परिषदेत कळाले!

मी उमेदवार आहे, हे मला येथे येईपर्यंत माहिती नव्हते. राहुल आवाडेंनी येथे घोषणा केल्यावरच मी उमेदवार असल्याचे समजल्याचा गौप्यस्फोट आमदार आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. नुकताच तुमची भेट घेतलेल्या आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा पाठिंबा आहे काय, यासह अन्य प्रश्‍नांची उत्तरे न देताच त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. पाठिंबा कोणाचा आहे की नाही, यासह अन्य प्रश्‍नांवर ते निरुत्तर झाले.

ही बंडखोरी नव्हे!

महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवारीला खोडा घालताय काय, यावर श्री. प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘खोडा घालत नाही. परिस्थिती बदलली म्हणून रिंगणात उतरत आहे.’’ जातीचे कार्ड चालविले जात आहे, अशी टीका होते, यावर ते म्हणाले, ‘‘आता जातीचे नव्हे, तर विकासाचे कार्ड चालणार आहे.’’ तुमची बंडखोरी आहे का, या प्रश्वावर ते म्हणाले, ‘‘मी बंडखोरी करत नाही. महायुतीचेच सर्व प्रमुख माझे नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी मी रिंगणात आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT