Shahu Chhatrapati Maharaj Kolhapur Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

'मी शाहू विचारांबरोबर!' 17 माजी महापौरांसह 228 माजी नगरसेवकांचा शाहू महाराजांसोबत राहण्याचा निर्धार

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी साऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

‘दत्तक विधान कायद्यांबाबत माहिती नसताना रात्रीत गद्दारी केलेल्यांनी वारसदारांबाबत चुकीचे विधान केले आहे. हुकूमशाहीविरोधातील लढाईला येथून सुरुवात करूया.’

कोल्हापूर : ‘मी शाहू विचारांबरोबर ...’ अशा फलकांवर स्वाक्षरी करत शहरातील १७ माजी महापौरांसह २२८ माजी नगरसेवकांनी आज महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रतिक्रिया पाहता त्यांना आपापल्या प्रभागांतील प्रचारातून चोख उत्तर द्यावे, असे आवाहन केले.

न्‍यू पॅलेस परिसरात सायंकाळी आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, कॉंग्रेसचे प्रदेश निरीक्षक रामचंद्र वळवी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी साऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे. कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे, हे ठरवायला हवे. एकत्रित ताकद निर्माण झाली तर राहून गेलेली कामे पूर्ण करून सुधारणा घडवता येईल, असे सांगितले. आमदार सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, ‘प्रभागात प्रत्येकाचा थेट संपर्क आहे. ठरवले तर २० ते २५ हजार मते देऊ शकतात. ही घरची उमेदवारी असून ताकदीने कामाला लागा.’

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी जनतेच्या रेट्यामुळे शाहू महाराजांची उमेदवारी झाली आहे. त्यांना अधिकाधिक मतांनी निवडून आणण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘दत्तक विधान कायद्यांबाबत माहिती नसताना रात्रीत गद्दारी केलेल्यांनी वारसदारांबाबत चुकीचे विधान केले आहे. हुकूमशाहीविरोधातील लढाईला येथून सुरुवात करूया.’

या वेळी माजी उपमहापौर प्रार्थना समर्थ, माजी स्थायी सभापती राजेश लाटकर यांची भाषणे झाली. सुनील मोदी यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर रामभाऊ फाळके, आर. के. पोवार, कांचन कवाळे, भीमराव पोवार, मारुतराव कातवरे, सई खराडे, सागर चव्हाण, वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, प्रतिभा नाईकनवरे, माई रेडेकर यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

इकडे की तिकडे...

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत माजी नगरसेवक असलेले आई-वडील उपस्थित होते. तर त्यांचा मुलगा यापूर्वी झालेल्या महायुतीच्या बैठकीत उपस्थित होता. त्याच बैठकीत उपस्थित राहिलेल्या माजी नगरसेवक पतीची माजी नगरसेविका असलेली पत्नी आज आघाडीच्या बैठकीत हजर होत्या. त्याचबरोबर यापूर्वी महाडिक गटातील नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनीही आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT