Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Narayan Rane esakal
लोकसभा २०२४

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : नारायण राणेंची धुरा मित्रपक्षांच्या मदतीवर; भावनिक वातावरण ठरणार डोकेदुखी

खासदार राऊत यांनी गेल्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये नीलेश राणे यांचा पराभव केला आहे.

मुझफ्फर खान

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती.

चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवून नारायण राणे यांनी पहिली लढाई जिंकली. मैदानात त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. मतदारसंघातील परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल असली तरीही घटक पक्षातील नेत्यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले तर राणेंसाठी ही निवडणूक अवघड राहणार नाही. मात्र, शिवसेना (Shiv Sena) फोडल्यानंतर तयार झालेले भावनिक वातावरण राणेंसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

कोकण हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता; परंतु राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर कोकणातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कोकणात भाजप वाढवण्यासाठी नारायण राणे (Narayan Rane) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची सूचना भाजपच्या श्रेष्ठींनी यापूर्वीच केली होती; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे किरण सामंत या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. अखेरच्या क्षणाला नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित झाली.

या मतदारसंघातील लढतीचा विचार केला तर गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती. येथील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण व कणकवली वगळता रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या चार मतदार संघांमध्ये ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार होते. २०२२च्या मध्याला शिवसेनेत फूट पडल्यानंतर या चारजणांपैकी रत्नागिरी व सावंतवाडीचे आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, उद्योगमंत्री उदय सामंत, कणकवलीतून राणेंचे चिरंजीव नीतेश तर सावंतवाडी मतदार संघातील शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर असे चार आमदार, माजी खासदार नीलेश राणे व भाजपचे इतर पदाधिकारी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपलब्ध आहेत. फक्त राजापूर आणि कुडाळ या दोन मतदारसंघांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे आमदार उरले आहेत.

हा तपशील पाहता ही लढाई राणेंच्या बाजूने झुकलेली दिसत आहे. पण, या दोन जिल्ह्यांमधील वाड्या-वस्त्यांपर्यंत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पसररलेले आहे. शिवसेनेतून काही आमदार फुटले असले तरी कार्यकर्ते मात्र पक्षाबरोबर ठाम आहेत. अशीच परिस्थिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल आहे. खासदार राऊत यांनी गेल्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये नीलेश राणे यांचा पराभव केला असल्याने या फौजेचे नीतीधैर्य उंचावलेले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा

मतदारसंघांपैकी फक्त एक कणकवलीचे आमदार नीतेश राणे भाजपाचे आहेत. इतर दोघांपैकी कुडाळचे आमदार वैभव नाईक ठाकरे गटाचे तर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिंदे गटाचे आहेत. यापैकी नाईक त्यांच्या पक्षाचे उमेदवार राऊत यांना मदत करणार हे स्वाभाविकच आहे; पण पूर्वेतिहास लक्षात घेता केसरकर राणेंना मनापासून किती सहकार्य करतात यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणेंचे मताधिक्य अवलंबून आहे.

नारायण राणे कोकणचे नेते आहेत. ते दीर्घकाळ राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांना कोकणच्‍या विकासाची जाण आहे. असा नेता पुन्हा केंद्रात गेला तर खऱ्या अर्थाने कोकणचा विकास होईल. नारायण राणे यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू.

-सदानंद चव्हाण, शिवसेना उपनेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT