Ratnagiri Sindhudurg Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

कोकणाला 'मशाली'ची गरज नाही, राऊतांनी आता राजकारणातून निवृत्ती घेऊन आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा; केसरकरांचा सल्ला

आमच्या कोकणात वीज दिवे व प्रकाश पुरेसा आहे. त्यामुळे येथील जनतेला मशालीची गरज नाही.

सकाळ डिजिटल टीम

'आज मी शिवसेनेचा स्टार प्रचारक आहे. त्यामुळे पक्षाकडून प्रचारासाठी मला ही व्हॅन दिली आहे. त्याचा खर्चही आमच्या पक्षाकडूनच उचलला जाणार आहे.'

सावंतवाडी : आमच्या कोकणात वीज दिवे व प्रकाश पुरेसा आहे. त्यामुळे येथील जनतेला मशालीची गरज नाही. त्याचप्रमाणे कोकणचा विकास करण्याकरिता केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री उदय सामंत व मी सक्षम आहोत. त्यामुळे विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेऊन आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा, असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिला.

येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेमधील नाराजी संपुष्टात आली असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्वतः प्रचारात उतरणार आहे. गावागावांत जाऊन महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत जनतेच्या भेटीगाठी घेणार आहे. मला ज्याप्रमाणे माझ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेचे मतरूपी आशीर्वाद मिळतात त्यापेक्षा जास्त मते या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रत्येक जिल्हा परिषदनिहाय निवडणूक प्रभारी नेमणार असून ते आपापल्या भागातील रोजचा अहवाल तालुकाप्रमुखांकडे सादर करतील व तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुखांकडे तो अहवाल देतील. त्या अनुषंगाने प्रचाराची रूपरेषा ठरविण्यात येईल.’ ते पुढे म्हणाले, ‘‘राजकारणात टीका ही होतच असते. अशी टीका करणारे लोक जास्त असतात, तर काम करणारी आमच्यासारखी माणसं कमी असतात. त्यामुळे लक्ष न देता काम करण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे. जे दहा वर्षांत काहीच करू शकले नाहीत, ते लोकांना आपलं काम सांगू शकत नसल्यामुळे आमच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. मात्र, येथील जनता त्यांना थारा देणार नाही.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत राऊत यांनी बोलू नये. ते हॉस्पिटल ठरलेल्या जागेतच होणार असून, काही न्यायप्रविष्ठ बाबींमुळे त्याला वेळ लागत असला तरीही ज्यावेळी हे हॉस्पिटल उभे राहील, त्यावेळी हे हॉस्पिटल महाराष्ट्रात आदर्शवत ठरणार आहे. शिवाय आम्ही विकासात्मक ज्या ज्या घोषणा केल्या, त्या सर्व घोषणांची पूर्तता येणाऱ्या कालावधीत निश्चितच पूर्ण केली जाणार आहे.’’

केसरकर म्हणाले, ‘‘मी प्रचारासाठी आणलेल्या व्हॅनिटी व्हॅनवरून विरोधक टीका करीत आहेत; परंतु अशी व्हॅनिटी व्हॅन केवळ उद्धव ठाकरेच वापरू शकतात का? आज मी शिवसेनेचा स्टार प्रचारक आहे. त्यामुळे पक्षाकडून प्रचारासाठी मला ही व्हॅन दिली आहे. त्याचा खर्चही आमच्या पक्षाकडूनच उचलला जाणार आहे. तो उमेदवाराच्या खर्चात जाणार नाही. शिवाय आमचा विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भाग असल्याने गावागावांत रात्री उशिरापर्यंत प्रचार झाल्यानंतर त्या व्हॅनेटी व्हॅनचा मी वापर करणार आहे. त्यामुळे उगाच कोणी याबाबत गैरसमज पसरू नयेत.’’

सिंधुदुर्गचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. या ठिकाणी पुरेशी वीज व गावागावांत मंदिरामध्ये तसेच घराघरांमध्ये देखील दिवे व पुरेशी लाईट पोहोचली आहे. त्यामुळे येथील जनतेला मशालीची गरज नाही. राऊत यांनी आता राजकारणातून संन्यास घेण्याची गरज आहे. त्यांनी आपला उर्वरित वेळ आपल्या कुटुंबासमवेत घालवावा, अशी मी त्यांना सदिच्छा देतो, असा टोला केसरकर यांनी यावेळी लगावला.

उद्धव ठाकरेंनी पावसात भिजू नये

परभणी येथे उद्धव ठाकरे यांनी भर पावसात सभा घेतली, तरीही त्याचा जनतेच्या मनावर काहीही परिणाम होणार नाही. उलट त्यांची प्रकृती नाजूक असून उगाच पावसात भिजल्यास ते आजारी पडतील. त्यामुळे त्यांनी अशी स्टंटबाजी करू नये, असा उपरोधिक सल्ला मंत्री केसरकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT