महाविकास आघाडी झाल्यापासून दिल्लीतील काँग्रेसच्या एकाही नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले नाही.
कोल्हापूर : ‘काँग्रेस पक्षाने केवळ एकच दलित उमेदवार दिला आहे. दलित असल्याने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी नाकारली गेली. काँग्रेस (Congress) पक्षाची भूमिका दलितविरोधी राहिली आहे. महाविकास आघाडी म्हणजे संधिसाधू आहे,’ अशी टीका खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसवर केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवरा म्हणाले, ‘वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना खुल्या जागेतून तिकीट देण्यास नकार देण्यात आला. कारण त्या दलित आहेत. या भूमिकेमुळे काँग्रेसने एका सुसंस्कृत, उच्चशिक्षित युवा उमेदवारावर अन्याय केला. संपूर्ण राज्यात काँग्रेसने केवळ एका दलित उमेदवाराला (Dalit Candidates) तिकीट दिले आहे. काँग्रेसची भूमिका नेहमीच दलितविरोधी राहिली आहे. महाविकास आघाडी ही केवळ संधीसाधू लोकांची आघाडी आहे.
सत्ता आणि खुर्चीसाठी ते एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी झाल्यापासून दिल्लीतील काँग्रेसच्या एकाही नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले नाही. मुंबईमध्ये घरांचा मोठा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या स्वतःच्या इमारतीला आवश्यक त्या परवानगी नाहीत. मग ते गोरगरिबांना काय घरे देणार?.''
‘खासदार संजय मंडलिक हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात. कोल्हापूरची जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,’ असा विश्वास देवरा यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.