Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : सेलिब्रिटींचा आज फैसला ; तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात रणधुमाळी

पश्चिम बंगालमध्ये ज्या आठ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) मतदान होत आहे, त्यात सेलेब्रिटी उमेदवारांचा सर्वाधिक भरणा आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये ज्या आठ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) मतदान होत आहे, त्यात सेलेब्रिटी उमेदवारांचा सर्वाधिक भरणा आहे. प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, क्रिकेटपटू कीर्ती आझाद, युसूफ पठाण, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) धडाकेबाज नेत्या महुआ मोईत्रा आणि शताब्दी रॉय व भाजपच्या उमेदवार आणि कृष्णानगरच्या राजघराण्यातील राणी माँ अर्थात अमृता राय, या सेलेब्रिटींना मतदार दिल्लीला पाठविणार की आपल्या मूळ गावी? याचा निर्णय आज मतदार करणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा अधिक प्रभाव असलेल्या भागात आज मतदान होत आहे. आज मतदान होत असलेल्या आठ लोकसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात ‘टीएमसी’चे विद्यमान पाच खासदार आहेत. परंतु यावेळी ‘टीएमसी’ला लढती सोपी राहिलेल्या नाही. काही मतदारसंघांमध्ये अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.

बरहामपूर, कृष्णानगर, राणाघाट, वर्धमान पूर्व, वर्धमान-दुर्गापूर, असनसोल, बोलपूर व बिरभूम या मतदारसंघात सोमवारी(ता.१३) मतदान होणार आहे. यापैकी कृष्णानगर (महुआ मोईत्रा), बर्धमान पूर्व (सुनील कुमार मोंडल), असनसोल (शत्रुघ्न सिन्हा), बोलपूर (असितकुमार मल) व बिरभूम (शताब्दी रॉय) हे मतदारसंघ टीएमसीच्या ताब्यात आहेत. तर राणाघाट व वर्धमान दुर्गापूर येथे भाजपचे खासदार आहेत.

सब कुछ अधीररंजन

बरहमपूर या मतदारसंघात काँग्रेसचे अधीररंजन चौधरी आपले वर्चस्व राखून आहेत. येथे ‘टीएमसी’ने क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांचा फार प्रभाव पडल्याचे चित्र नाही. यावेळीही अधीररंजन चौधरी सहाव्यांदा लोकसभेत पुन्हा प्रवेश करतील, अशीच शक्यता आहे.

तर धडाकेबाज आणि दमदार भाषणांमुळे प्रसिद्धीस आलेल्या ‘टीएमसी’च्या नेत्या महुआ मोईत्रा यांचाही फैसला आज होणार आहे. कृष्णानगर उत्तर आणि दक्षिण या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्यावेळी भाजपला आघाडी मिळाली होती. यावेळी भाजपने कृष्णानगर वसविणाऱ्या कृष्णचंद्र राय यांच्या राजघराण्यातील अमृता राय यांना येथून उमेदवारी देऊन रंगत आणली आहे. ‘टीएमसी’च्या शताब्दी रॉय यांचा फैसला याच टप्प्यात वीरभूम मतदारसंघात होणार आहे. शताब्दी रॉय सलग चौथ्यांदा मतदारांसमोर जात आहेत. या मतदारसंघात ४० टक्के मुस्लिम मतदार आहेत.

असनसोलमध्ये बाहेरचा मुद्दा

असनसोल मतदारसंघात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा ‘टीएमसी’चे उमेदवार आहेत. २०१९ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रसिद्ध गायक बाबूल सुप्रियो निवडून आले होते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत ‘टीएमसी’चे उमेदवार म्हणून प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा निवडून आले आहेत. भाजपने येथे एस. एस. अहलुवालिया यांना उमेदवारी दिली आहे. अहलुवालिया यांच्या पत्नी बंगाली आहेत. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा बाहेरचे आहेत, असा प्रचार येथे सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेला थोडाचवेळात सुरुवात होणार

SCROLL FOR NEXT