Satara Lok Sabha 2024 esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : निवडणूक खर्चात उदयनराजे आघाडीवर तर, शशिकांत शिंदे दुसऱ्या क्रमांकावर; किती केलाय दोघांनी खर्च?

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा दिली आहे. या मर्यादेतच सर्वांनी आपला खर्च दाखवला आहे.

सातारा : सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघाचे मतदान तिसऱ्या टप्प्यात झाले आहे. आता निकालाची प्रतीक्षा सर्वांना आहे; पण या निवडणुकीत कोणी किती पैसे खर्च केले, याची उत्सुकता सर्वांना आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सर्वाधिक ४९ लाख ५७ हजार १८७ रुपये, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी ४६ लाख सात हजार ६७९ रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाकडे दिलेल्या खर्चाच्या अहवालात नमूद केले आहे.

आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणीनंतर २३ दिवसांपर्यंत खर्च दाखवण्याची मुभा आहे. त्यामुळे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभेची निवडणूक ही उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी झाली. यामध्ये सात मे रोजी झालेल्या मतदानात ६३.१६ टक्के मतदान झाले आहे. यावेळेस दोन्ही उमेदवारांनी होऊ दे खर्च म्हणत सढळ हाताने खर्च केल्याची चर्चा आहे.

निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा दिली आहे. या मर्यादेतच सर्वांनी आपला खर्च दाखवला आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत उमेदवारांनी दिलेला खर्च पहिला, तर सर्वाधिक खर्च खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शशिकांत शिंदे आहेत, तर प्रशांत कदम यांनी १० लाख २० हजार ७५० रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे.

उमेदवारनिहाय दाखवलेला खर्च असा आहे : उदयनराजे भोसले ४९ लाख ५७ हजार १८७, शशिकांत शिंदे ४६ लाख सात हजार ६७९, प्रशांत कदम १० लाख २० हजार ७५०, सुरेश कोरडे पाच लाख १४ हजार २९४, संजय गाडे दोन लाख ४९ हजार ४९५, तुषार विजय मोटलिंग एक लाख एक हजार ६५१, संजय वाघमारे ८६ हजार ८५०, निवृत्ती शिंदे ५५ हजार ६२०, सीमा पोतदार ४७ हजार ०५२, सदाशिव बगल ४२ हजार १८२, सचिन महाजन ३६ हजार ९२५.

विश्वजित पाटील उंडाळकर ३० हजार ४२९, मारुती जानकर २५ हजार ६४५, आनंद थोरवडे २२ हजार ४७८, डॉ. अभिजित बिचुकले १४ हजार ६००, प्रतिभा शेलार १३ हजार ६५०. या सर्व खर्चात सर्वात कमी खर्च प्रतिभा शेलार या उमेदवाराने दाखवला आहे. आता मतमोजणीनंतर २३ दिवसांपर्यंत उर्वरित खर्च द्यायचा आहे. आता मतमोजणीनंतर २३ दिवसांपर्यंत उर्वरित खर्च द्यायचा आहे.

आयोगाच्या निरीक्षकांकडूनही खर्चाचे आकडे

उमेदवारांनी दिलेला खर्च काही असला, तरी निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षक यंत्रणेने उमेदवारनिहाय झालेल्या खर्चाचे आकडेही नोंदवलेले आहेत. त्यानुसार खासदार उदयनराजे भोसले यांचा खर्च ७५ लाख २८ हजार ७३४ रुपये दाखवला आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा नेमका खर्च किती याची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT