Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : शेतकरीकल्याणाला प्राधान्य ; कर्जमुक्तीचे उद्धव ठाकरेंचे वचन

शेतकऱ्यांना कर्ज आणि ‘जीएसटी’मुक्त करण्याचे प्रमुख आश्वासन देत ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचा स्वतंत्र वचननामा जाहीर केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शेतकऱ्यांना कर्ज आणि ‘जीएसटी’मुक्त करण्याचे प्रमुख आश्वासन देत ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचा स्वतंत्र वचननामा जाहीर केला. मोदी सरकारला महाराष्ट्राविषयी आकस आणि द्वेष आहे. देशात इंडिया आघाडीचे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्याची लूट थांबवून पुन्हा महाराष्ट्राला, मुंबईला आणि मराठी भाषेला गतवैभव आणि दरारा प्राप्त करून दिला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी पक्षाचा वचननामा जाहीर करताना दिले. भाजपने गेल्या दहा वर्षांत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा सवालही मतदारांनी भाजपला विचारावा असे ठाकरेंनी म्हटले आहे.

शिवसेना नेहमी वचननामा प्रसिद्ध करत आली आहे तर भाजपचा ‘थापानामा’ असतो असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रासाठी आवश्यक बाबींचा समावेश करून महाविकास आघाडीचा एकत्रित स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल असे ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट केले होते.

मात्र आज सकाळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाने’ त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ठाकरे गटाने देखील घाईघाईत आज सायंकाळी वचननामा प्रसिद्ध केला. लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या (ता.२६) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने हा वचननामा प्रसिद्ध केला आहे. या वचननाम्यात शेतकरी, महिला, रोजगार आणि आरोग्याच्या सुविधांवर भर देण्यात आला आहे. ‘इंडिया’ आघाडीने आणि काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा अमलात आणण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल असेही ठाकरे यांनी नमूद केले.

घटना बदलण्यासाठी बहुमत हवे

‘मातोश्री’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी हा वचननामा प्रसिद्ध केला. वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘लहानपणी भुताची भीती वाटली की रामाचा जप करावा त्यामुळे भुते पळतात असे म्हटले जायचे. भाजपची काहीशी अशीच अवस्था झाली आहे. भाजपला पराभव समोर दिसू लागल्याने ते आता राम राम म्हणत आहेत. त्यांना देशाची राज्यघटना बदलायची आहे त्यामुळे त्यांना पाशवी बहुमत हवे आहे.’’

तेव्हा लूट थांबवू

अडीच वर्षांत महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एककलमी कार्यक्रम हे पोकळ इंजिन सरकार करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला.महाराष्ट्रात येणारे उद्योग पळविले जात आहेत. हिरेबाजार, क्रिकेट मॅच, फिल्मफेअर अवॉर्ड सगळेच पळविले जात असल्याचा आरोप करत ठाकरेंनी महाराष्ट्राची लूट इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर थांबवू असा दावा केला. ‘‘ इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर गुजरातच्या हक्काचे त्याला देऊ. उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम राज्यांचा आदर ठेवला जाईल पण वित्तीय केंद्र नव्याने महाराष्ट्रात उभे करू ज्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःच्या जिल्हाातच रोजगार कसा मिळेल? हे पाहिले जाईल,’’ असे ठाकरे म्हणाले.

केवळ कर्जमुक्तीवर थांबणार नाही

महाराष्ट्रात फक्त कर्जमुक्ती करून आम्ही थांबणार नाही तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याचे चित्रविचित्र नियम बदलले जातील. शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल. शेतीची विविध अवजारे, बियाणे, खते यावर केंद्र सरकार पैसा घेते आणि वर्षाला फक्त सहा हजार रुपये देते. ही लूट थांबविण्यासाठी या सगळ्या गोष्टी जीएसटीमुक्त करू. शेतीला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव देऊ. शेतमाल साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना गोदामे, शीतगृहे देऊ असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.

ठाकरे म्हणाले

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणार

पर्यावरणस्नेही उद्योग वाढवून विनाशकारी उद्योगांना रोखू

शेतमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना गोदामे- शीतगृहे उपलब्ध करून देणार

नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून तो ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचे दुर्दैवी काम उद्धव ठाकरे यांना करावे लागत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता, आज मात्र ‘उबाठा’च्या ‘यूटर्ननाम्या’त फसवाफसवी आहे.

- चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT