Vanchit Bahujan Aghadi sakal
लोकसभा २०२४

Vanchit Bahujan Aghadi : ‘वंचित’ला निरनिराळी निवडणूक चिन्हे

येत्या १९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी वंचित बहुजन आघाडीला निरनिराळे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : येत्या १९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी वंचित बहुजन आघाडीला निरनिराळे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. लोकसभेच्या पाचपैकी चार मतदारसंघांत ‘वंचित’ला तीन वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली आहेत.

निवडणूक आयोगाने सोमवारी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार आणि त्यांना वितरित झालेल्या निवडणूक चिन्हांनी माहिती दिली. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीला रामटेक आणि गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलिंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात उसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ‘वंचित’ला एकच निवडणूक चिन्ह देण्याचे टाळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT